
iQOO चा तगडा स्मार्टफोन भारतात दाखल! 100W चार्जिंगने वेधलं सर्वांचं लक्ष, किंमत वाचून तुम्हीही व्हाल चकित
कमी किंमतीत तगडा स्मार्टफोन शोधताय? मोठी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेसह REDMI A7 Pro लाँच, वाचाा फीचर्स
नवीन iQOO 15 Apex Edition भारतात 12GB+ 256GB आणि 16GB + 512GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. स्मार्टफोनच्या 12GB+ 256GB व्हेरिअंटची किंमत 72,999 रुपयांपासून सुरु होते. तर 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली आहे. प्री-बुकिंग ऑफर अंतर्गत, ग्राहकांना 6,000 रुपयांपर्यंतची त्वरित सूट मिळू शकते, ज्यामुळे दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 66,999 रुपये आणि 73,999 रुपये होईल. iQOO 15 Apex Edition स्मार्टफोनच्या प्री बुकींगला सुरुवात करण्यात आली आहे. या डिव्हाईसची विक्री 6 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता आयक्यू इंडिया वेबसाईट, अॅमेझॉन, विवोचे एक्सक्लूसिव स्टोर्स, रिलायंस डिजिटल आणि देशभरातील रिटेल स्टोअर्सवर सुरु होणार आहे. जे ग्राहक स्मार्टफोनची प्री-बुकींग करतील त्यांना 1,899 रुपयांचे एक iQOO TWS फ्री मिळणार आहे. याशिवाय, 12 महिन्यांपर्यंतची नो-कॉस्ट EMI ऑफर देखील उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – iQOO)
डुअल-सिम (नॅनो+नॅनो) वाला आयक्यू 15 एपेक्स एडिशन स्मार्टफोन अँड्रॉईड 16-बेस्ड ओरिजिनओएस 6 वर चालतो. कंपनीने दावा केला आहे की, स्मार्टफोनला पाच अँड्रॉइड अपग्रेड आणि सात वर्षांचे सुरक्षा अपडेट्स दिले जाणार आहेत. या लेटेस्ट लाँच हँडसेटमध्ये 6.85-इंच सॅमसंग एम 14 8 टी एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 2K रेजोल्यूशन, 508 पीपीआई पिक्सेल डेंसिटी आणि 6,000 निट्सची लोकल पीक ब्राइटनेस दिली आहे.
नवा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेटने सुसज्ज आहे. ज्यासोबत 16GB पर्यंत एलपीडीडीआर5x रॅम, 512GB पर्यंत UFS4.1 इंटरनल स्टोरेज आणि एक Q3 सुपरकंप्यूटिंग चिप देखील दिली आहे. नव्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, iQOO 15 Apex Edition मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX921 प्रायमरी कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX882 1/1.95-इंच पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस समाविष्ट आहे. तर स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. iQOO 15 Apex Edition हा IP68 + IP69 रेटिंगसह येतो. यामध्ये 7,000mAh क्षमतेची सिलिकॉन-कार्बन बॅटरी असून ती 100W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.