
iQOO ने स्पर्धकांना फोडला घाम! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री, असे आहेत पावरफुल फीचर्स
आयक्यूचा लेटेस्ट स्मार्टफोन 12GB + 256GB, 12GB + 512GB, 16GB + 256GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,099 म्हणजेच सुमारे 58,000 रुपये ठेवली आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,499 म्हणजेच सुमारे 64,000 रुपये, 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,799 म्हणजेच सुमारे 68,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,199 म्हणजेच सुमारे 74,000 रुपये आहे. तर डिव्हाईसच्या 16GB + 1TB या टॉप एंड व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 85,000 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन किंगयुन, ट्रॅक एडिशन, आणि लीजेंड एडिशन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
डुअल-सिम iQOO 15T (नॅनो + नॅनो) अँड्रॉईड 16 वर बेस्ड ओरिजिन ओएस 6 वर चालतो. हा स्मार्टफोन 144Hz रिफ्रेश रेटसह 6.82-इंच 2K रेजोल्यूशन वाली एलटीपीओ अमोलेड स्क्रीनला स्पोर्ट करतो. बायोमेट्रिक सिक्योरिटीसाठी हँडसेटमध्ये 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.
iQOO चा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 मॉन्स्टर एडीशनने सुसज्ज आहे. ब्रंडने असा दावा केला आहे की, या प्रोसेसरसह लाँच करण्यात आलेला हा ग्लोबली पहिला स्मार्टफोन आहे. हे डिव्हाईस एक Q3 सुपरकंप्यूटिंग चिपसह जोडण्यात आले आहे, जे ग्राफिक्स-इंटेसिव टास्क्स हँडल करते. यासोबतच यामध्ये 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे.
नव्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, iQOO 15T मध्ये डुअल रियर कॅमेरा सिस्टिम दिली आहे. ज्यामध्ये CIPA 4.5-लेव्हल स्टॅबिलायझेशन आणि 4x लॉसलेस झूमचा दावा असलेला 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल शूटर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नव्या स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे.
iQOO 15T मध्ये 5G, 4G एलटीई, ब्लूटूथ 5.4, वायफाय 7, जीपीएस, बेईडू, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस, आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट हे कनेक्टिविटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. या डिव्हाईसमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे.