सेल्फीची सवय पडू शकते महागात! ‘पीस साइन’ फोटोमुळे वाढला डेटा चोरीचा धोका; सायबर एक्सपर्ट्सचा गंभीर इशारा
अलीकडेच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही व्यक्तीच्या साध्या सेल्फीमधून देखील फिंगरप्रिंट डेटा कॉपी केला जाऊ शकतो. विशेषत: ‘पीस साइन’ दाखवतं क्लिक केलेल्या सेल्फीसाठी हा धोका अधिक आहे. कारण या फोटोमध्ये लोकांची बोटे अगदी स्पष्टपणे फोटोमध्ये दिसत असतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सने एका लाईव्ह डेमोममध्ये दाखवले आहे की, सध्याचे तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झाले आहे आणि धोकादायक देखील बनले आहे. सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सने लाईव्ह डेमोमध्ये एका सेलिब्रिटीच्या फोटोमधून केवळ बोटांचे छायाचित्र काढून फिंगरप्रिंट पॅटर्न नमुना पुन्हा कसा तयार करता येतो, हे दाखवले. म्हणजेच तुम्ही सोशल मीडियावर अपलोड केलेले फोटो देखील सायबर गुन्हेगारांना आमंत्रण देऊ शकतात. तुमचा बायोमॅट्रिक डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचू शकतो.
तज्ज्ञांचे असं म्हणणं आहे की, फोटो सुमारे 5 फुटांच्या अंतरावर क्लिक करण्यात आला असेल आणि बोटं फोटोमध्ये अगदी स्पष्टपणे दिसत असतील तर एआयच्या मदतीने फिंगरप्रिंट डेटा अगदी सहजपणे कॅप्चर केला जाऊ शकतो. तसेच थोड्या अंतरावरून क्लिक करण्यात आलेल्या फोटोमध्ये देखील एआयच्या मदतीने काही प्रमाणात डिटेल्स मिळू शकतात.
अनेक लोकांना असे वाटतं की, मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बोटं अस्पष्ट दिसतात, ज्यामुळे कोणताही धोका नसतो. मात्र लोकांचा हाच गैरसमज हॅकर्ससाठी फायदेशीर ठरू शकतो. AI आधारित फोटो एन्हांसमेंट टूल्स आता अस्पष्ट फोटो देखील हाय क्वालिटी ईमेजमध्ये बदलू शकतात. हेच एआय आधारित तंत्रज्ञान हॅकर्सना फिंगरप्रिंट पॅटर्न समजण्यासाठी आणि कॉपी करण्यासाठी मदत करू शकते.
सर्वात मोठी चिंता म्हणजेच पासवर्डप्रमाणे फिंगरप्रिंट बदलू शकत नाही. जर एखादा व्यक्ती पासवर्ड विसरला तर नवीन पासवर्ड तयार केला जाऊ शकतो. फिंगरप्रिंटच्या बाबतीत असं घडत नाही. पण बायोमेट्रिक डेटा एकदा चोरी झाला की हॅकर्स त्याचा दिर्घकाळासाठी वापर करू शकतात. या बायोमॅट्रिक डेटाच्या मदतीने बँक अकाउंट, डिजिटल पेमेंट सिस्टिम आणि ओळखीसंबंधित अनेक गोष्टी धोक्यात येऊ शकतात. यामुळे आता प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना तसेच आपला फोटो कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
Ans: कारण अशा फोटोमध्ये बोटं स्पष्ट दिसत असल्याने AI च्या मदतीने फिंगरप्रिंट डेटा कॉपी केला जाऊ शकतो.
Ans: होय, प्रगत AI आणि फोटो एन्हांसमेंट तंत्रज्ञानामुळे फोटोमधील बोटांचे पॅटर्न ओळखणे शक्य होत आहे.
Ans: ज्या फोटोमध्ये बोटं जवळून आणि स्पष्ट दिसतात, त्या फोटोमध्ये डेटा चोरीचा धोका जास्त असतो.






