Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट… यूजर्सना मिळणार नवा अनुभव

रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग अधिक जलद आणि सोपे करण्यासाठी IRCTC च्या नव्या वेबसाईटची तयारी पूर्ण केली आहे. नव्या प्लॅटफॉर्ममध्ये यूजर-फ्रेंडली डिझाइन, कमी स्टेप्स आणि फास्ट तात्काळ बुकिंगसारखे अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 11, 2026 | 12:04 PM
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट... यूजर्सना मिळणार नवा अनुभव

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट... यूजर्सना मिळणार नवा अनुभव

Follow Us
Follow Us:
  • IRCTC लवकरच नवीन तिकीट बुकिंग वेबसाईटचे पब्लिक बीटा लॉन्च करू शकते.
  • नव्या वेबसाईटमध्ये कमी कॅप्चा, जलद बुकिंग आणि सोपा इंटरफेस मिळणार आहे.
  • तात्काळ तिकीट बुकिंगदरम्यान बॉट्सवर नियंत्रण ठेवण्यासाठीही नवे बदल केले जाणार आहेत.
भारतीय रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकींगसाठी लवकरच एक नवीन वेबसाईट येणार आहे. आईआरसीटीसी लवकरच नवीन वेबसाईटचे बीटा वर्जन सादर करणार असल्याचे सांगितलं जात आहे. नवीन वेबसाईटमध्ये यूजर्सना पूर्वीप्रमाणे स्लो इंटरफेस, सतत गोंधळात टाकणारे कॅप्चा आणि पॉप्स यांसारख्या समस्यांचा सामवा करावा लागणार नाही. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि एमएनआईटी जयपूरच्या विद्यार्थ्यांनी आईआरसीटीसीच्या नवीन संकेतस्थळाच्या ‘बीटा’ आवृत्तीची पाहणी केली आहे.

iPhone Tips: 100W चार्जरमुळे खराब होऊ शकते आयफोनची बॅटरी? काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

रेल्वे अधिकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी यामधील काही बग्स शोधले आहेत. या त्रुटी दूर झाल्यानंतर लवकरच वेबसाईटचे पब्लिक बीटा जारी केले जाणार असल्याची शक्यता आहे. 15 जुलैपर्यंत वेबसाईटचे पब्लिक बीटा जारी होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, नवीन वेबसाईटमधून नको असलेले कॅप्चा आणि पॉप-अप्स हटवले जाणार आहेत. या वेबसाईटवर तात्काळ बुकींग देखील अतिशय वेगाने होणार आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच रेल्वे तात्काळ तिकीट बुकींगमधील बॉट्सवर आळा घालण्याचा प्रयत्न करणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

नवीन वेबसाईटमध्ये काय असणार खास?

भारतीय रेल्वेच्या नवीन तिकीट बुकींग वेबसाईटमध्ये आधीसारख्या जाहिराती आणि ग्राफीक्स दिसणार नाहीत. लॉगिन आणि पेमेंटसाठी जास्त वेळ लागू नये यासाठी कॅप्चा सोपा आणि छोटा केला जाणार आहे. नवीन वेबसाईटमध्ये प्रवाशांना सीट पाहण्यासाठी वेगवेगळे क्लास जसे स्लीपर, थर्ड एसी, सेकेंड एसीवर क्लिक करावे लागणार नाही. यूजर्सना एकाच स्क्रीनवर सीटची माहिती मिळणार आहे.

यासोबतच, आईआरसीटीसीने ऑनलाईन तिकीट बुकींगची प्रोसेस कमी केली आहे. आता काही स्टेप्स फॉलो करूनच तिकीट बुक केली जाऊ शकते. वेबसाईटमध्ये प्रवाशाचे डिटेल्स सेव्ह राहणार आहेत. यामुळे प्रत्येकवेळी तिकीट बुक करताना प्रवाशाला माहिती भरावी लागणार नाही. आईआरसीटीसीची सध्याची वेबसाईट अनेकदा तात्काळ तिकीट बुकींग सुरु होताच क्रॅश होते, ज्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच प्रवाशांच्या कॅप्चाबाबत देखील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कॅप्चा सोडवण्यासाठी मर्यादित वेळ मिळतो. जोपर्यंत कॅप्चा सोडवला जातो, वेळ निघून जातो. त्यामुळे पुन्हा नवीन कॅप्चाची मागणी करावी लागते.

OpenAI चे मोठे पाऊल! ChatGPT Work AI एजेंट लाँच; फक्त प्रश्नांची उत्तरे नाही, आता पूर्ण प्रोजेक्टही हाताळणार

नव्या वेबसाईटचे बीटा वर्जन

नव्या तिकीट बुकींग वेबसाईटचे पब्लिक बीटा वर्जन 15 जुलैपर्यंत जारी केले जाऊ शकते. याबाबत रेल्वे बोर्डाने सांगितलं आहे की, याच्या बीटा वर्जनमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. बुकींगच्या स्टेप्स कमी करण्यासोबतच एकाच ठिकाणी सर्व सीटांची माहिती मिळणार आहे. यामुळे तिकीट बुकिंग प्रोसेस फास्ट होणार आहे. नव्या वेबसाईटमध्ये नवीन डिझाईन आणि यूजर-फ्रेंडली इंटरफेस दिला जाईल, अशी आशा आहे, जे हाय-ट्रॅफिक अगदी सहजपणे हँडल करू शकणार आहे. नव्या वेबसाईटमध्ये पेमेंट गेटवे समस्या देखील सोडवली जाऊ शकते.

Web Title: Irctc will launch new website for faster ticket booking soon users will get new experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Indian Railway
  • IRCTC
  • Tech News

संबंधित बातम्या

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?
1

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट
2

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती; असा कराल अर्ज
3

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती; असा कराल अर्ज

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express
4

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.