Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone Tips: 100W चार्जरमुळे खराब होऊ शकते आयफोनची बॅटरी? काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

iPhone Battery: 100W फास्ट चार्जरमुळे आयफोनची बॅटरी खराब होते, असा समज अनेकांमध्ये आहे. मात्र प्रत्यक्षात आयफोनची स्मार्ट चार्जिंग सिस्टिम चार्जिंग नियंत्रित करत असल्याने चांगल्या दर्जाच्या चार्जरचा वापर सुरक्षित मानला जातो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 11, 2026 | 09:26 AM
iPhone Tips: 100W चार्जरमुळे खराब होऊ शकते आयफोनची बॅटरी? काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

iPhone Tips: 100W चार्जरमुळे खराब होऊ शकते आयफोनची बॅटरी? काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • 100W चार्जर वापरल्याने आयफोनची बॅटरी खराब होत नाही.
  • आयफोनची स्मार्ट चार्जिंग सिस्टिम आवश्यक तेवढीच वीज स्वीकारते.
  • लोकल चार्जर, जास्त उष्णता आणि चुकीच्या चार्जिंग सवयी बॅटरीचे अधिक नुकसान करतात.
iPhone Battery Tips: स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्मार्टफोन वापरण्यासाठी आवश्यक असणारी सर्वात महत्त्वाची अ‍ॅक्सेसरी म्हणजेच चार्जर. सध्या बाजारात अनेक प्रकारचे चार्जर उपलब्ध आहेत, जे फास्ट चार्जिंगचा दावा करतात. या फास्ट चार्जरमुळे डिव्हाईसची बॅटरी अतिशय वेगाने चार्ज होते. अँड्रॉईड स्मार्टफोन्सप्रमाणेच बाजारात आयफोनसाठी अनेक चार्जर उपलब्ध आहेत.

OpenAI चे मोठे पाऊल! ChatGPT Work AI एजेंट लाँच; फक्त प्रश्नांची उत्तरे नाही, आता पूर्ण प्रोजेक्टही हाताळणार

बाजारात फास्ट चार्जर उपलब्ध

आयफोन यूजर्स आणि फोनच्या बॅटरीची समस्या काही नवीन नाही. आयफोन यूजर्सना फोनची बॅटरी वारंवार चार्ज करावी लागते, यामुळे अनेकांना वैताग येतो. तसेच आयफोनसोबत दिल्या जाणाऱ्या चार्जरमुळे फोन अनेकदा स्लो चार्ज होतो, ज्यामुळे यूजर्सना अनेक समस्या येतात. यावरील उपाय म्हणजेच सध्याची अ‍ॅडव्हांस टेक्नोलॉजी. बाजारात अ‍ॅडव्हांस टेक्नोलॉजीने सुसज्ज असलले अनेक चार्जर्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे आयफोन वेगाने चार्ज होतो. सध्या बाजारात 65W, 100W आणि 140W पर्यंत सपोर्ट असणारे फास्ट चार्जर उपलब्ध आहेत. मात्र अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की, 100W च्या चार्जरमुळे आयफोनची बॅटरी खराब होऊ शकते का?  (फोटो सौजन्य: Pinterest)

स्मार्ट चार्जिंग मॅनेजमेंट सिस्टिम

मिळालेल्या माहितीनुसार, एखाद्या चार्जरवर 100W लिहीले असेल तर याचा अर्थ असा नाही की, हा चार्जर प्रत्येक डिव्हाईसला 100W च्या वेगाने चार्ज करू शकतो. याशिवाय, आयफोनमध्ये स्मार्ट चार्जिंग मॅनेजमेंट सिस्टिम असते, जे ठरवते की डिव्हाईसला किती पावर पाहिजे. जर तुमचा आयफोन जास्तीत जास्त 20W, 27W किंवा 35W पर्यंत चार्जिंगला सपोर्ट करत असेल तर 100W चा चार्जर देखील फोनच्या शक्तीपेक्षा जास्त पावर फोनमध्ये पाठवू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की, 100W च्या चार्जरचा वापर केला तरी देखील डिव्हाईसमध्ये तेवढीच वीज शोषली जाईल, जितकी बॅटरीला गरज आहे.

या कारणांमुळे बॅटरी खराब होते

सहसा, आयफोनची बॅटरी खराब होण्याचे कारण जास्त वॉट वाला चार्जर नसतो. खरंतर जेव्हा तुम्ही एखाद्या लोकल किंवा खराब चार्जरचा वापर करता तेव्हा खरं नुकसान होतं. इतकंच नाही तर, फोन वारंवार गरजेपेक्षा जास्त गरम होणं, दिर्घकाळापर्यंत डिव्हाईस 100 टक्के चार्ज करणं आणि सतत हेवी गेमिंग करताना डिव्हाईस चार्ज करणं, यामुळे बॅटरी लवकर खराब होते. यामुळे नेहमी चांगल्या क्वालिटीचा आणि ओरिजीनल चार्जरचा वापर करा, असा सल्ला तज्ज्ञ नेहमी देतात.

Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर

योग्य चार्जरचा वापर करा

अ‍ॅपलच्या आयफोनमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम आणि यूएसबी पॉवर डिलिव्हरी (USB-PD) सारख्या टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. या सिस्टिमच्या मदतीने फोनचा चार्जर आणि फोन परस्पर ठरवते की डिव्हाइसला किती वीज पुरवायची आहे. यामुळेच तुमचा आयफोन चांगल्या दर्जाच्या 100W यूएसबी-पीडी चार्जरने चार्ज करणे सुरक्षित मानले जाते. हा उच्च-शक्तीचा चार्जर बॅटरीवर कोणताही ताण टाकत नाही आणि तिला सुरक्षित ठेवतो.

Web Title: Is iphone battery damage by 100w charger what is the truth read in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • iphone
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

तब्बल 40 दिवस चालणार बॅटरी अन् रिवर्स चार्जिंग सपोर्ट… Nokia चा नवा फीचर फोन लाँच! किंमत फक्त 4 हजारांहून कमी
1

तब्बल 40 दिवस चालणार बॅटरी अन् रिवर्स चार्जिंग सपोर्ट… Nokia चा नवा फीचर फोन लाँच! किंमत फक्त 4 हजारांहून कमी

१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? ‘या’ देशाने संसदेत मांडले नवे विधेयक, नियम मोडल्यास कंपन्यांना १०% दंड
2

१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? ‘या’ देशाने संसदेत मांडले नवे विधेयक, नियम मोडल्यास कंपन्यांना १०% दंड

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
3

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
4

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.