(फोटो सौजन्य: Pinterest)
Aadhaar Number, VID किंवा Enrollment ID चुकीचा भरणे
आधारकार्ड ऑनलाईन डाउनलोड न होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे चुकीची माहिती भरणे. अनेकदा घाईगडबीत १२ अंकी नंबर, १६ अंकी Virtual ID आणि २८ अंकांचा Enrollment ID चुकीचा टाईप केला जातो. एक अंक जरी चुकला तरी UIDAI सिस्टीम मची माहिती सत्यापित करता येत नाही आणि डाउनलोड प्रक्रिया थांबते. यामुळेच माहिती भरताना ती योग्य भरली गेली आहे की नाही ते एकदा चांगलं तपासा.
Registered Mobile Number वर OTP न येणे
e-Aadhaar डाउनलोड करण्यासाठी UIDAI आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवते. जर मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक नसेल किंवा नेटवर्क वीक असल्यास किंवा फोनला सिग्नल नसल्यास मोबाईल फोनवर OTP येण्यास समस्या निर्माण होते. अनेकदा नेटवर्क बिझी असल्याने OTP येण्यास काही मिनिटे देखील लागू शकतात. अशात घाबरु नका, काही वेळ वाट पाहा आणि पुन्हा एकदा OTP पाठवण्याच्या पर्यायावर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर बदलला असल्यास आधारकार्डमध्ये तो अपडेट करणे फार गरजेचे आहे.
UIDAI Server खूप लोड पडणे
अनेकदा समस्या आपल्यााकडून नाही तर UIDAI Server कडून होत असते. जेव्हा एकाच वेळी मोठ्या संख्येने वेबसाईवर लोक आधारकार्ड डाउनलोड करु लागतात तेव्हा सर्वरवर लोड पडू लागतो. अशावेळी वेबसाईट हळू चालू लागते ज्यामुळे आधारकार्ड डाउनलोड करण्यात समस्या निर्माण होतात. पुन्हा पुन्हा ट्राय करुनही जर समस्या निर्माण होत असेल तर काहीवेळाचा ब्रेक घ्या आणि मग पुन्हा प्रयत्न करा. पहाटे किंवा रात्री उशिरा रहदारी कमी असते.






