Jio-Airtel च्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 200 रुपयांहून कमी आहेनुकतेच भारतातील सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. या किमतींमध्ये एकूण 25 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे आता युजर्सच्या खिशाला चांगलीच कात्री बसल्याचे दिसून येत आहे. अनेक युजर्स यामुळे नाराजदेखील झाले आहेत. तथापि, युजर्ससाठी अजूनही 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत अशा योजनांची सुविधा आहेत, जे विनामूल्य अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटा सारखे फायदे देतात. आज आम्ही तुम्हाला जियो-एयरटेलच्या सर्वात स्वस्त प्लॅनविषयी माहिती सांगत आहोत. स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
Jio-Airtel चे स्वस्त प्लॅन्स
रिलायन्स जिओच्या स्वस्त प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी आपल्या ग्राहकांसाठी 199 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या किमतीत, कंपनी आपल्या ग्राहकांना मोफत कॉलिंग आणि दैनिक डेटा सारखे फायदे देते.
एयरटेलच्या स्वस्त प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, ही कंपनी आपल्या ग्राहकांना 199 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची सुविधा देखील देते. या किमतीत कंपनी ग्राहकांना मोफत कॉलिंग आणि डेटा सुविधा पुरवते.
हेदेखील वाचा – Meta AI आता हिंदी भाषेत उत्तरे देणार! व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरमध्ये चॅटबॉटला मिळाला 7 भाषांचा सपोर्ट
दोन्ही खाजगी दूरसंचार कंपन्या एकाच किमतीत त्यांच्या ग्राहकांना डेटा आणि कॉलिंगचे रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. तथापि, Jio आणि Airtel च्या समान किमतीचे रिचार्ज प्लॅन वेगवेगळे फायदे घेऊन येतात. Jio या स्वस्त प्लॅनद्वारे आपल्या वापरकर्त्यांची डेटा आवश्यकता लक्षात ठेवते, तर Airtel आपल्या ग्राहकांना अधिक वैधता प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते. दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगमध्ये कोणतीही तडजोड करण्याची गरज नाही.
याच पार्शवभूमीवर आम्ही तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे वायफाय असेल किंवा तुम्हाला दररोज डेटाची आवश्यकता नसेल तर तुम्ही एअरटेलच्या प्लॅनचा विचार करू शकता मात्र जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामांत डेटाची गरज भासत असेल तर तुमच्यासाठी जियोच्या प्लॅन उत्तम आहे.