सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धीमत्तेचे महत्त्व फार वाढले आहे. आता कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर कठीणातील कठीण काम चुटकीसरशी करता येतात. दरम्यान, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप्सची मालकी असलेल्या मेटा एआयमध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत. आता मेटा एआय इंग्रजी भाषेप्रमाणे नवीन 7 भाषेत उपलब्ध होणर आहे आणि मुख्य म्हणजे यात हिंदी भाषेचाही समावेश आहे.
हिंदी व्यतिरिक्त, Meta AI इतर 6 भाषांमध्ये सपोर्ट देणार आहे.व्हॉट्सॲप उघडताच Meta AI चा पर्याय दिसू लागतो. मेटा एआयचा वापर करणे खूप सोपे आहे, यासाठी युजर्स मेटा एआयच्या चॅट पेजवर येऊन याला कोणताही प्रश्न विचारून त्या गोष्टीचे उत्तर जाणून घेऊ शकतात.
व्हॉट्सॲप व्यतिरिक्त, आता मेटा एआय इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि फेसबुकवर देखील वापरला जाऊ शकतो. तुम्ही Meta AI शी नवीन भाषांमध्ये WhatsApp, Instagram, Messenger आणि Facebook वर बोलू शकता. मेटा एआय हिंदीव्यतिरिक्त, हिंदी-रोमनाइज्ड लिपी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश या भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. इतकेच नाही तर यात आणखी काही भाषांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळेच आता लवकरच याच्यासोबत आणखीन काही भाषांचा सपोर्ट जोडला जाईल.
हेदेखील वाचा – स्मार्टफोनला स्क्रीनगार्ड लावण्याआधी ‘या’ गोष्टी ध्यानात असूद्यात, नुकसान होणार नाही
मेटा म्हणते की, कंपनी आपल्या ॲप्स आणि डिव्हाइसेससह मेटा एआयच्या एक्सेसचा विस्तार करत आहे. एवढेच नाही तर युजर्सना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी या AI चॅटबॉटमध्ये नवीन फीचर्स जोडले जात आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, मेटा एआय आता तब्बल 22 देशांमध्ये उपलब्ध आहे. Meta AI आता अर्जेंटिना, चिली, कोलंबिया, इक्वेडोर, मेक्सिको, पेरू आणि कॅमेरून या भाषांमध्येही आणले गेले आहे.
आत Meta AI गुगल सर्चप्रमाणे वापरता येईल. जसे तुम्ही गुगलला प्रश्न विचारता तसेच तुम्ही Meta AI ला प्रश्न विचारू शकता. Meta AI चा चॅटबॉट काही सेकंदात त्याच्या डेटावर आधारित उत्तरे तयार करतो. याशिवाय, Meta AI चा वापर मेल्स ड्राफ्ट करण्यासाठी, इंग्रजी शिकण्यासाठी, रजा अर्ज लिहिण्यासाठी आणि स्पेसिफिक फोटो तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.