Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात...
गुगल मॅप्सचा वापर जगभरातील करोडो लोकं करतात. पण सध्या या लोकप्रिय नेव्हिगेशन प्लॅटफॉर्म गुगल मॅपला टक्कर देण्याासाठी Mappl सज्ज झालं आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी Mappl ची प्रशंसा केली होती. तेव्हापासून या अॅपच्या युजर्सच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश
अँड्रॉइड युजर्समध्ये गुगल मॅप्स हे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप असले तरी, ऑटोमोटिव्ह ओईएम (ऑरिजनल इक्व्यूपमेंट मॅन्युफेक्चरर) मध्ये मॅपल्सने आघाडी घेतली आहे. कंपन्या त्यांच्या कार, बाईक्स आणि इलेक्ट्रिक व्हीकल्सच्या प्रायमरी सिस्टमसाठी Mappl चा वापर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. खरं तर Mappl हे नेव्हिगेशन प्लॅटफॉर्म MapmyIndia ने तयार केले आहे. या प्लॅटफॉर्मचे फाउंडर राकेश आणि रश्मि वर्मा आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Mappls ने डिजिटल अॅडरेस सिस्टम बनवले आहे, जे सरकारच्या DIGIPIN सिस्टमसह तयार करण्यात आले आहे. या पिनच्या मदतीने लोकेशन शोधणं आणि शेअर करणं या प्लॅटफॉर्ममध्ये अतिशय सोपे आहे. Mappls पिन सहा अक्षरांचा अल्फान्यूमॅरिक कोड आहे, जो मॅपमध्ये एखाद्या खास लोकेशनसाठी यूनिक असतो. यूजर्स त्यांच्या लोकेशनचा पिन स्वत: तयार करू शकतात. याशिवाय या प्लॅटफॉर्मची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे प्लॅटफॉर्म हाइपरलोकल नेविगेशन लक्षात ठेऊन डिझाईन करण्यात आले आहे. हे युजर्सना लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी स्टेप-बाय स्टेप डायरेक्शन गाइड करते.
Mappls प्लॅटफॉर्ममध्ये इन-बिल्ट टोल कॅलकुलेटर देण्यात आला आहे. याच्या मदतीने कोणत्याही लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी किती टोल भरावा लागणार आहे, याची माहिती युजर्स आधीच तपासू शकतात. युजर्सना वेगवेगळे मार्ग आणि त्यामध्ये पडणाऱ्या टोलची अपेक्षित माहिती देखील आधीच दिली जाते. केवळ टोलच नाही तर हे अॅप इंधनाचा खर्च देखील सांगते, ज्याद्वारे युजर्स ट्रिपचा खर्च देखील मोजू शकतात.
हे Mappls चे सर्वात युनिक फीचर आहे, ज्यामध्ये इंटरसेक्शन सारखे फ्लाईओवर आणि अंडरपासचे रियलिस्टिक फोटो पाहायला मिळतात. यामुळे युजर्सना मार्ग समजण्यासाठी देखील मदत होते. यामुळे युजर्सना एक्सप्रेसवेच्या बाहेर पडण्याचे मार्ग किंवा लेन बदलण्याबाबत शेवटच्या क्षणी निर्णय घेण्यापासून वाचवले जाते. मॅपल्सने 2021 मध्ये इस्रोसोबत भागीदारी केली. इस्रोच्या मदतीने, हे अॅप स्थानिक तपशील अचूकपणे प्रदर्शित करते.
Mappls चे लाइव ट्रॅफिक सिग्नल ट्रॅकिंग सिस्टम सध्या केवळ बंगळुरु शहरात सुरु करण्यात आली आहे. यासाठी कंपनीने बंगळरु ट्रॅफिक पोलीसांसोबत भागिदारी केली आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये शहरांच्या सर्व 169 ट्रॅफिक सिग्नलचा रियल टाइम डेटा देण्यात आला आहे. ही एआय-आधारित सिस्टम लाईव्ह सिग्नल ट्रॅकिंग असलेल्या युजर्सना कमी रहदारी असलेले पर्यायी मार्ग सुचवते.
Mappls अॅपला भारतीय युजर्सची गरज आणि त्यांच्या समस्या लक्षात ठेऊन तयार करण्यात आले आहे. यामध्ये लोकल लेवलचे अलर्ट देखील दिले जातात. युजर्सना ऐपवर पाथहोल्स, स्पीड ब्रेकर, शार्प टर्न आणि स्पीड कॅमेऱ्याचे अलर्ट देखील दिले जातात.






