14 वर्षांपूर्वी लाँच झालं होतं लोकप्रिय अॅप Instagram! तरूणांमध्ये अजूनही क्रेझ कायम
तुमचं इंस्टाग्रामवर अकाऊंट आहे का? तुम्ही रिल्स पाहता का? तुम्ही तुमच्या अकाऊंटवर पोस्ट आणि रिल्स शेअर करता का? असे प्रश्न आपण अनेकदा समोरच्या व्यक्तिला विचारतो. सध्या लोकप्रिय असलेल्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मबद्दल कोणाला विचारलं तर इंस्टाग्रामचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी वापरलं जाणार इंस्टाग्राम आज अनेक लोकांच्या कमाईचे साधन बनत आहे.
हदेखील वाचा- स्वस्त iPhone SE 4 लाँचची तयारी सुरु, ऍपल इंटेलिजेंस आणि 48MP कॅमेरासह करणार एंट्री
इंस्टाग्रामवर युजर्सच्या सोयीसाठी नेहमीच नवनवीन अपडेट लाँच केले जातात. इंस्टाग्रामचे जगभरात 2 बिलीयनहून अधिक युजर्स आहेत. तर एकट्या भारतात इंस्टाग्राम युजर्सची संख्या 362 मिलीयन आहे. इंस्टाग्रामवर तुम्ही रिल्स, पोस्ट, स्टोरी इत्यादी शेअर करू शकता आणि लोकांसोबत चॅट देखील करू शकता. इंस्टाग्राम एक अमेरिकन सोशल मीडिया कंपनी असून त्याचे मुख्यालय मेनलो पार्क, कॅलिफोर्निया येथे स्थित आहे. 2012 मध्ये Mark Zuckerberg ने 1 लाख डॉलरना इंस्टाग्राम विकत घेतले. तेव्हापासून त्याने या अॅपवर अनेक बदल केले. इंस्टाग्रामवर येणारे नवनवीन अपडेट लोकांना आवडू लागले. (फोटो सौजन्य – pinterest)
14 वर्षांपूर्वी लाँच झालेलं इंस्टाग्राम अजूनही प्रचंड लोकप्रिय आहे. लहान, मोठे, तरूण मंडळी सर्वांमध्ये इंस्टाग्रामची वाढती क्रेझ तुम्ही पाहू शकता. इंस्टाग्राम 6 ऑक्टोबर 2010 रोजी लाँच करण्यात आले. तीन महिन्यांत, त्याची युजर्स संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचली. इंस्टाग्रामचे संस्थापक केविन सिस्ट्रॉम आणि माइक क्रिगर होते. केविन सिस्ट्रॉमचा जन्म 30 डिसेंबर 1983 रोजी झाला होता आणि त्याने हॉलिस्टन, मॅसॅच्युसेट्स, स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बॅचलर डिग्री मिळवली होती. ग्रॅज्युएशननंतर केविन सिस्ट्रॉम यांनी गुगल कंपनीत 3 वर्षे काम केले आणि त्यानंतर त्यांनी गुगलची नोकरी सोडली आणि ‘नेक्स्टस्टॉप’ नावाची कंपनी सुरू केली, मात्र त्यानंतर जुलै 2010 मध्ये फेसबुकने नेक्स्टस्टॉप कंपनी ताब्यात घेतली.
हदेखील वाचा- OpenAI ने ChatGPT मध्ये आणलं Canvas इंटरफेस, आता सोपं होणार ‘हे’ काम
इंस्टाग्रामच्या जुन्या नावाबद्दल बोलायचे तर त्याचे जुने नाव बर्बन होते. सध्या Adam Mosseri हे इंस्टाग्रामचे सीईओ आहेत. तर Meta कंपनी इंस्टाग्रामची मालक आहे. आणि Mark Zuckerberg हा मेटाचा सीईओ आहे. आयफोन वापरकर्त्यांसाठी लोकेशन शेअरिंग सक्षम करण्यासाठी, चेक इन करताना पॉइंट मिळवण्यासाठी आणि कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यासाठी इंस्टाग्राम लाँच करण्यात आले होते.
पण त्यादरम्यान या ॲपमध्ये अनेक बग्स आले ज्यामुळे हे ॲप फ्लॉप होऊ लागले. यानंतर इंस्टाग्रामच्या संस्थापकांनी या ॲपमध्ये अनेक बदल केले आणि ते फोटो शेअरिंग ॲप बनले. जेव्हा हे ॲप तरुण स्टार्समध्ये लोकप्रिय होऊ लागले तेव्हा मेटाने त्याची मालकी घेतली आणि त्याला इंस्टाग्राम हे नवीन नाव दिले. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये इंस्टाग्रामची क्रेझ कायम आहे. एप्रिल 2012 मध्ये, इंस्टाग्राम अँड्रॉइड फोनसाठी रिलीझ करण्यात आले आणि एका दिवसापेक्षा कमी वेळात इंस्टाग्रामला दहा लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले.