Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच

Lava Bold N4 Lite Launched: बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आता एका नव्या लावा स्मार्टफोनची एंट्री झाली आहे. हा स्मार्टफोन दमदार फीचर्स आणि पावरफुल बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 29, 2026 | 11:09 AM
स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच

Follow Us
Follow Us:
  • लावा बोल्ड एन4 लाइट ची सुरुवातीची किंमत ₹8,099 असून लॉन्च ऑफरमध्ये तो ₹7,999 मध्ये मिळणार आहे.
  • 6.75 इंचाचा HD+ डिस्प्ले आणिएमआयएल-एसटीडी-810एच मिलिटरी-ग्रेड ड्यूरेबिलिटी फोनमध्ये देण्यात आली आहे.
  • 3GB रॅम, 32GB स्टोरेज आणि 8MP कॅमेरा असलेल्या या फोनची विक्री 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
Lava Smartphone Launched: इंडियन स्मार्टफोन ब्रँड लावाने आणखी एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. एंट्री-लेव्हल सेगमेंटमधील हा स्मार्टफोन Lava Bold N4 Lite या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने बजेट सेगमेंटमधील यूजर्सना लक्षात घेऊन हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठा डिस्प्ले, पावरफुल बॅटरी आणि 4G कनेक्टिविटीसह अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. नव्या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी

लावा बोल्ड एन4 लाइट ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन लावा बोल्ड एन4 लाइट 8,099 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. लाँच ऑफरअंतर्गत कंपनी हा स्मार्टफोन 7,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी देणार आहे. मात्र या ऑफरचा फायदा घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे. कारण ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची विक्री ॲमेझॉन.इन वर 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य: Amazon) 

लावा बोल्ड एन4 लाइट चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.75 इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचे रेजॉल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये MIL-STD-810H मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी रेटिंग देखील मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन एम्पायर गोल्ड आणि घोस्ट सिल्व्हर रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

प्रोसेसर

स्मार्टफोनचा परफॉर्मंस अधिक चांगला व्हावा यासाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर 28nm युनिसाॅक 9863A प्रोसेसर देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये पॉवरव्हीआर जीई 8322 जीपीयू दिला आहे. फोनमध्ये 3GB फिजिकल रॅम आहे, ज्याला वर्च्युअल रॅमच्या मदतीने एक्स्ट्रा 3GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. या डिव्हाईसमध्ये 32GB इंटरनल स्टोरेज देखील देण्यात आले आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डद्वारे 64GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी बजेट फ्रेंडली लावा स्मार्टफोनमध्ये 8MP चा सिंगल रियर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश मिळणार आहे. तर स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंच कॅमेरा देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे.

फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

बॅटरी

तसेच, लावा बोल्ड एन4 लाइटमध्ये 10W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. या डिव्हाईसमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, एफएम रेडियो, यूएसबी टाइप-सी पोर्ट, डुअल 4G VoLTE, वाय-फाय 802.11 ac, ब्लूटूथ 4.2 आणि जीपीएस सारखे कनेक्टिविटी फीचर्स देखील दिले आहेत.

Web Title: Lava bold n4 lite launched in india in budget friendly price range read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी
1

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर
2

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर

बॅटरी इतकी मोठी की पावरबँकही फिकी! Redmi Note 17 Pro Max 5G ची जपानमध्ये धमाकेदार एंट्री, फीचर्स पाहून म्हणाल ‘कमालच!’
3

बॅटरी इतकी मोठी की पावरबँकही फिकी! Redmi Note 17 Pro Max 5G ची जपानमध्ये धमाकेदार एंट्री, फीचर्स पाहून म्हणाल ‘कमालच!’

फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
4

फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.