Motorola चा नवा मास्टरस्ट्रोक! 'या' स्मार्टफोनचे नवे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंट लाँच... इतकी आहे किंमत
Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच… फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
मोटोरोला एज 70 फ्युजन स्मार्टफोनचे नवीन 12GB + 512GB व्हेरिअंट 36,999 रुपयांच्या किंंमतीत लाँच करण्यात आले आहे. यापूर्वी कंपनीने हा स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Motorola)
मोटोरोला एज 70 फ्युजन स्मार्टफोन आता 4 व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन पँटोन सिलुएट, पँटोन ब्लू सर्फ आणि पँटोन ओरिएंट ब्लू या रंग पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोन व्हेरिअंटची विक्री भारतात सुरु झाली आहे. मिड रेंज किंमतीत उपलब्ध असलेल्या या स्मार्टफोनची स्पर्धा आता थेट वनप्लस नॉर्ड सिरीज, रेडमी टर्बो 5 आणि नथिंग फोन 4ए सिरीजसोबत होणार आहे.
मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राइटनेस 5,200 निट्स आहे.
मोटोरोलाचा हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 चिपसेटने सुसज्ज आहे.
स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 68W फास्ट चार्जिंगला सपोरट करते.
फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 70 फ्युजनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) फीचरसह येतो. यामध्ये 13MP चा अल्ट्रा-वाइड सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 16 सह येतो. कंपनीचे म्हणणे आहे की, याला तीन अँड्रॉइड अपडेट्स मिळतील.






