Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच... फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
एआयप्लस नोव्हा 2 निओ 5G दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB + 128GB आणि 6GB + 128GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. एआयप्लस नोव्हा 2 प्रो 5G स्मार्टफोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफरअंतर्गत कंपनी 1000 रुपयांचे बँक डिस्काऊंट देणार आहे. स्मार्टफोनची विक्री 26 जूनपासून फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Neo vibes and Pro moves! Ready to level up your game? Nova 2 Neo 5G & Nova 2 Pro 5G sale goes live 26 June at 12 PM, on Flipkart. Set your reminders.#AiPlusSmartphone #NovaSeries #IndiasGotNova #Nova2Pro5G #Nova2Neo5G pic.twitter.com/YCDKKNpgVt — Ai+ Smartphone (@aiplus_official) June 22, 2026
एआयप्लस नोव्हा 2 निओ 5जी स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि ब्राईटनेस 600 निट्सपर्यंत आहे. यासोबतच फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे, जो 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंक वाढवले जाऊ शकते.
एआयप्लस कंपनीचा हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित NxtQuantum ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 48-मेगापिक्सेलचा सोनी आयएमएक्स 582 रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी दिली आहे.
एआयप्लस नोव्हा 2 प्रो 5G च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.9-इंच मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 144Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्स ब्राइटनेस असलेला FHD+ LCD पॅनल आहे. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 2 टीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.
Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक
कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 48-मेगापिक्सेलचा सोनी IMX582 प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेंस आणि 13-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा फोन स्टीरियो स्पीकर आणि कस्माइजेबल रियर नोटिफिकेशन लाइटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. डिव्हाईसमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह आईपी 65 रेटिंगची सुविधा मिळणार आहे. दोन्ही एआयप्लस फोन्स ‘NxtQuantum OS’ वर चालतात. ही कंपनीची अँड्रॉईड 16 वर आधारित खास ‘युजर इंटरफेस’ (UI) प्रणाली आहे.






