Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

7100mAh बॅटरीसह नव्या Motorola स्मार्टफोनने केला धमाका! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Motorola Edge 70 Max Launched: मोटोरोलाने भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 54,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 17, 2026 | 02:32 PM
7100mAh बॅटरीसह नव्या Motorola स्मार्टफोनने केला धमाका! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज... जाणून घ्या किंमत

7100mAh बॅटरीसह नव्या Motorola स्मार्टफोनने केला धमाका! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज... जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • Motorola ने भारतात एज 70 मॅक्स 5G स्मार्टफोन 54,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर, 144Hz अमोलेड डिस्प्ले आणि 7,100mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • फोनमध्ये 50MP Sony कॅमेरा, IP68/IP69 रेटिंग आणि 90W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने भारतात एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात Motorola Edge 70 Max या नावाने लाँच केला आहे. कंपनीने त्यांच्या Edge 70 लाइनअपचे पाचवे मॉडेल म्हणून हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हे डिव्हाईस भारतात Pantone-क्यूरेटेड तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे.

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं

मोटोरोला एज 70 मॅक्सची किंमत आणि उपलब्धता

नवा स्मार्टफोन कंपनीने 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 256GB या बेस व्हेरिअंटची किंमत 54,999 रुपये आहे. तर टॉप एंड व्हेरिअंट 12GB + 256GB ची किंमत 59,999 रुपये आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर खास बँक ऑफर देखील देणार आहे. निवडक बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना 5 हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. स्मार्टफोनची विक्री 5 जुलैपासून मोटोरोलाच्या ऑनलाईन स्टोअरवर सुरु होणार आहे. ग्राहक हा नवीन स्मार्टफोन पँटोन ॲक्वा ग्रे, पँटोन डार्क शॅडो आणि पँटोन आइस मेल्ट रंगांच्या पर्यायात खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Motorola) 

मोटोरोला एज 70 मॅक्सचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, मोटोरोला एज 70 मॅक्समध्ये 6.8-इंच QHD+ एक्सट्रीम अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 7,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन आणि ओल्या हातांनी अधिक चांगल्या टच रिस्पॉन्ससाठी ‘वॉटर टच’ फीचर देखील देण्यात आले आहे.

प्रोसेसर

नव्या डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 16 वर बेस्ड हेलो यूआय मिळणार आहे. या डिव्हाईसला 3 वर्षांपर्यंत ओएस अपग्रेड आणि पाच वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट देण्याचा दावा करण्यात आला आहे. फोनमध्ये 3nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेट देखील मिळणार आहे. यासोबतच या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील देण्यात आले आहे. या हँडसेटमध्ये 5,500 चौ.मिमी उष्णता बाहेर टाकण्याच्या क्षेत्रावर पसरलेले व्हेपर चेंबर कूलिंग सोल्यूशन देखील आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या नव्या स्मार्टफोनमध्ये IP68 + IP69 रेटिंग दिली आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनमध्ये सोनी एलवायटी-710 सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनवाला 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा प्राइमरी कॅमेरा देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 119-डिग्री फील्ड ऑफ व्यू आणि ऑटोफोकस मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला 32-मेगापिक्सेल (f/2.2) चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर

बॅटरी

फोनमध्ये 7,100mAh बॅटरी दिली आहे, जी 90W (वायर्ड) आणि 25W (वायरलेस) फास्ट चार्जिंगसह 5W वायर्ड रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी डिव्हाईसमध्ये 5G, 4G एलटीई, वायफाय 7, ब्लूटूथ 6, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, नाविक, बेईडू आणि क्यूझेडएसएस पर्याय दिले आहे.

Web Title: Motorola edge 70 max launched in india with 7100mah battery read features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं
1

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर
2

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
3

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

AI Robots : स्मार्टफोननंतर आता AI रोबोटची एंट्री; चिनी कंपनीचं मोठं पाऊल, Elon Musk लाही टक्कर?
4

AI Robots : स्मार्टफोननंतर आता AI रोबोटची एंट्री; चिनी कंपनीचं मोठं पाऊल, Elon Musk लाही टक्कर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.