नामांकित टेक कंपनी Google ने आपल्या वार्षिक विकासक कॉन्फरन्स इव्हेंट Google I/O 2024 मध्ये Android 15 Beta 2 अपडेट जारी केला आहे आणि यामध्ये असलेली अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये आता समोर आली आहेत. नवीन अपडेटनंतर आता फोनचा परफॉर्मन्स आणि प्रीमियम डिव्हाईसचा अनुभव खूप छान वाटेल. याशिवाय यात यूजर्सची प्राइवेसी आणि सुरक्षिततेचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Android 15 Beta 2 मध्ये यूजर्ससाठी ॲडव्हान्स थेफ्ट प्रोटेक्शन फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत आणि कंपनीने दावा केला आहे की, फोन चोरी झाल्यानंतर यूजर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील.
[read_also content=”Apple ने लाँच केले iOS 17.5 अपडेट, युजर्सना कोणते नवीन फीचर्स मिळणार, सविस्तर वाचा https://www.navarashtra.com/technology/apple-launched-ios-17-5-update-what-new-features-users-will-get-read-in-detail-533920.html”]
प्राइवेट स्पेस:
Android 15 Beta 2 मध्ये, यूजर्सना सुरक्षित डिजिटल स्पेस मिळेल आणि त्याच्या मदतीने ॲप आयकॉन्स, डेटा आणि नोटिफिकेशन देखील लपवले जाऊ शकतात. लपवलेले ॲप किंवा डेटा ऑथेंटिकेशन नंतर ओपन केले जाऊ शकतात.
थिफ्ट डिटेक्शन लॉक:
Android 15 Beta 2 मधील या फीचरच्या मदतीने, फोन डिव्हाईस चोरीला गेल्याचे ऑटोमॅटीक ओळखले जाईल आणि याच्या सेन्सरद्वारे ऑटोमॅटीक फोन लॉक होईल. तुमचा फोन जरी चोरीला गेला किंवा पळवून नेला तरी मोबाईलमधून तुमचा डेटा चोरीला जाणार नाही. जरी प्ले स्टोरमध्ये कोणतीही संशयास्पद एक्टिविटी मिळाली तर गुगलला त्याचा अहवाल दिला जाईल. यानंतर यूजर्सना एक चेतावणी देखील दिली जाईल.
फ्रॉड ऐप्सपासून सुरक्षा:
Android 15 Beta 2 गूगल प्ले प्रोटेक्ट ऑन-डिवाइस AI सह फसवणूक आणि फिशिंग एक्टिविटी करणाऱ्या ऐप्स ना ओळखण्याचे काम करेल. जर प्ले स्टोरमध्ये कोणतीही संशयास्पद एक्टिविटी आढळली तर त्याचा अहवाल त्वरित गुगलला जाईल. यानंतर यूजर्सना एक चेतावणी देखील जरी केली जाईल.
सुरक्षित स्क्रीन शेयरिंग:
Android 15 Beta 2 मध्ये स्क्रीन शेअरिंग दरम्यान नोटिफिकेशन आणि OTP ऑटो हाइड केले जातील. इतर यूजर्सना फोनचे नोटिफिकेशन्स आणि OTP स्क्रीनवर दिसणार नाहीत. याशिवाय, लेटेस्ट अपडेटनंतर आता फोनमधील वन टाइम पासवर्ड नोटिफिकेशनमध्ये लपविला जाईल. यामुळे मालवेअर हे कोड चोरू शकणार नाही.
अपडेटसाठी एलिजिबल असलेली डिवाइस:
Pixel 6, Pixel 6 Pro, Pixel 6a, Pixel 7, Pixel 7 Pro, Pixel 7a, Pixel Tablet, Pixel Fold, Pixel 8, Pixel 8 Pro, Pixel 8a