IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफत
आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले, नागरिक संतापले
जिओचा 100 रुपयांचा हा डेटा ओनली पॅक आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 5 जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो, ज्याची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. यासोबतच कंपनी 1 महिन्यासाठी जियोहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन देखील ऑफर करते. जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल तर हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये तुम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना मोफत पाहू शकणार आहात. मात्र लक्षात ठेवा की हा डेटा ओन्ली प्लॅन असल्यामुळे तुमच्या नंबरवर बेस प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
हा देखील कंपनीचा डेटा ओन्ली प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 90 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते आणि यासोबतच 15 जीबी डेटा देखील मिळतो. एवढंच नाही तर कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना जियोहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे. मात्र लक्षात ठेवा की, यासाठी तुमच्या नंबरवर बेस प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.
एअरटेललच्या 100 रुपयांच्या डेटा ओन्ली पॅकची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 6 जीबी डेटा मिळतो. यासोबतच कंपनी यूजर्सना एका महिन्यासाठी जियोहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे. हा प्लॅन वापरण्यासाठी तुमच्याकडे बेस प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.
एअरटेलच्या 195 रुपयांच्या डेटा प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 12 जीबी डेटा मिळतो. कंपनीच्या या प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी जियोहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेचे फायदे देखील आहेत. हा देखील एक डेटा प्लॅन आहे, म्हणून त्यासाठी बेस प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.
जियोहॉटस्टार सब्सक्रिप्शन मोफत ऑफर करणारा हा कोणत्याही टेलीकॉम ऑपरेटरचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 44 रुपये असून या प्लॅनमध्ये यूजर्सना 1 जीबी डेटास मिळतो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 1 दिवसाची असली तरी देखील यामध्ये 30 दिवसांसाठी जियोहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.
व्हिआयच्या 101 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह 5GB डेटा मिळतो. यामध्ये 1 महिन्यासाठी जियोहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. या दोन्ही VI प्लॅनसह, बेस प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.






