Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशखबरी! Instagram आणि Facebook प्रमाणेच आता Snapchat वरूनही करता येणार बंपर कमाई, वाचा पैसे कमवण्याची नवी पद्धत

Earn Money from Snapchat: स्नॅपचॅटवरून पैसे कमावणे एक चांगला पर्याय असू शकते. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ज्याप्रमाणे व्हिडीओ शेअर करून पैसे कमावता येतात, त्याप्रमाणे स्नॅपचॅटवर स्पॉटलाईटच्या मदतीने पैसे कमावता येतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 16, 2025 | 07:45 PM
खुशखबरी! Instagram आणि Facebook प्रमाणेच आता Snapchat वरूनही करता येणार बंपर कमाई, वाचा पैसे कमवण्याची नवी पद्धत

खुशखबरी! Instagram आणि Facebook प्रमाणेच आता Snapchat वरूनही करता येणार बंपर कमाई, वाचा पैसे कमवण्याची नवी पद्धत

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अनेकांसाठी कमाईचे साधन बनले आहे. ज्याप्रमाणे लोकं ऑफीसमध्ये जाऊन 9 तास कामं करून पैसे कमावतात त्याचप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कंटेट क्रिएटर्स पैसे कमावू शकतात. कंटेट क्रिएटर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांचे व्हिडीओ आणि रिल्स अपलोड करून चांगले पैसे कमावू शकतात. या सर्वांमुळेच आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अनेक लोकांसाठी कमाईचे साधन बनले आहेत.

Garena Free Fire MAX च्या आजच्या कोड्ससह प्लेअर्सना मिळणार आकर्षक रिवॉर्ड्स, अशा प्रकारे करा रिडीम

इंस्टाग्राम आणि फेसबुकवर कंटेट क्रिएटर्स व्हिडिओ आणि फोटो अपलोड करून भरपूर पैसे कमवतात. यामुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची तरूणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकसोबतच आणखी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तरूणांना वेड लावत आहे. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे स्नॅपचॅट. अनेकांना स्नॅपचॅटचं प्रचंड वेड असतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेकजण सतत स्नॅप पाठवत असतात. तुम्ही स्नॅपचॅट वापरणारे असे अनेक लोक पाहिले असतील. तसेच तुम्ही स्वत: देखील स्नॅपचॅट वापरत असाल. पण, तुम्हाला माहिती आहे का की इंस्टाग्राम आणि फेसबुकसोबतच स्नॅपचॅटमधूनही पैसे कमवता येतात? (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्नॅपचॅट कसे काम करते?

स्नॅपचॅटचे सर्वात लोकप्रिय वैशिष्ट्य म्हणजे स्नॅप्स. तुम्ही स्नॅपचॅटवर स्नॅप-स्नॅप खेळणारे अनेक लोक पाहिले असतील. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभर काय काय केलं या सर्वांचे अपडेट्स स्नॅपवर मित्रांसोबत शेअर केले जातात. हे स्नॅप फोटो आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये मित्रांना पाठवता येतात. विशेष म्हणजे हे फोटो चॅटमध्ये फक्त काही सेकंदांसाठी दिसतात आणि नंतर गायब होतात. मित्रांनी पाठवलेले स्नॅप तुम्ही चॅटमध्ये सेव्ह देखील करू शकता.

स्नॅप पाठवण्यासाठी, तुम्हाला स्क्रीनच्या मध्यभागी असलेल्या कॅमेरा आयकॉनवर क्लिक करावे लागेल. तुम्ही फोटो काढू शकता किंवा तुमच्या गॅलरीमधून फोटो निवडू शकता. तुमचा स्नॅप अधिक मजेदार बनवण्यासाठी तुम्ही फिल्टर, स्टिकर्स आणि मजकूर देखील जोडू शकता. आता तुम्ही तुमच्या निवडलेल्या मित्रांना स्नॅप पाठवू शकता.

स्नॅपचॅट वरून पैसे कसे कमवायचे?

स्नॅपचॅटवर पैसे कमविण्याचा मार्ग म्हणजे स्पॉटलाइट फीचर. तुम्हाला तुमचे सर्वोत्तम व्हिडिओ स्नॅप्स स्पॉटलाइटवर अपलोड करावे लागतील. जर इतर स्नॅपचॅट युजर्सना तुमचा स्नॅप आवडला आणि त्यांनी पाहिला तर तुम्ही क्रिस्टल्स अवॉर्ड मिळवू शकता. तुम्ही नंतर या क्रिस्टल पुरस्कारांचे पैशात रूपांतर करू शकता.

आता घरबसल्या मिळणार सर्व बँकिंग अपडेट्स! भारतीय रिजर्व बँकने लाँच केला WhatsApp चॅनेल, अशा प्रकारे करा जॉईन

येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुम्ही किती पैसे कमवाल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की किती लोक तुमच्या स्नॅपकडे लक्ष देतात आणि लाईक करतात. इतर लोकांचे स्पॉटलाइट व्हिडिओ कसे काम करत आहेत यावर देखील ते अवलंबून असते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, तुमचा स्नॅप इतर लोकांच्या स्नॅप्सपेक्षा चांगला आणि मजेदार असावा, तरच तुम्ही पैसे कमवू शकाल.

Web Title: Now you can earn money from snapchat just like instagram and facebook know the process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत
1

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत

BlackBerry सारखी डिझाईन आणि कमाल आहेत फीचर्स! Clicks Technology चा नवा स्मार्टफोन गाजवतोय मार्केट, जाणून घ्या किंमत
2

BlackBerry सारखी डिझाईन आणि कमाल आहेत फीचर्स! Clicks Technology चा नवा स्मार्टफोन गाजवतोय मार्केट, जाणून घ्या किंमत

Meta ची नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरणार डोकेदुखी! AI मुळे Facebook-Instagram यूजर्सवर होणार थेट परिणाम
3

Meta ची नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरणार डोकेदुखी! AI मुळे Facebook-Instagram यूजर्सवर होणार थेट परिणाम

Jio Recharge Plan: 30 रुपयांहून कमी किंमत आणि फायदे अफाट… हे आहेत जिओचे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स
4

Jio Recharge Plan: 30 रुपयांहून कमी किंमत आणि फायदे अफाट… हे आहेत जिओचे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.