Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर घोषणा झालीच! OnePlus ने बंद केले OxygenOS; अमेरिका आणि युरोपमधून गुंडाळला कारभार, यूजर्सवर काय होणार परिणाम?

OnePlus ने त्यांच्या स्मार्टफोन सॉफ्टवेअरबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने ऑक्सिजनओएस बंद करून भविष्यातील डिव्हाइससाठी कलरओएस स्वीकारण्याची घोषणा केली असून, यासोबतच अमेरिका आणि युरोपमधील व्यवसायाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 19, 2026 | 12:12 PM
अखेर घोषणा झालीच! OnePlus ने बंद केले OxygenOS; अमेरिका आणि युरोपमधून गुंडाळला कारभार, यूजर्सवर काय होणार परिणाम?

अखेर घोषणा झालीच! OnePlus ने बंद केले OxygenOS; अमेरिका आणि युरोपमधून गुंडाळला कारभार, यूजर्सवर काय होणार परिणाम?

Follow Us
Follow Us:
  • वनप्लसने ऑक्सिजनओएस बंद करून अँड्रॉईड 17 आधारित कलरओएस 17 स्वीकारण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
  • पात्र OnePlus स्मार्टफोन यूजर्सना भविष्यात ऐच्छिकरित्या कलरओएस 17 वर अपडेट करण्याचा पर्याय मिळणार आहे.
  • कंपनीने अमेरिका आणि युरोपमध्ये नवीन वनप्लसडिव्हाइसचे रोलआउट थांबवण्याची घोषणा केली असून, विद्यमान ग्राहकांना सपोर्ट सुरू राहणार आहे.
टेक कंपनी वनप्लसने आता अधिकृतपणे घोषणा केली आहे की, त्यांची अँड्रॉईड स्किन ऑक्सिजनओएस आता बंद केले आहे. आता टेक कंपनी वनप्लस भविष्यातील त्यांचा सर्व डिव्हाईससाठी पॅरेंट कंपनी ओप्पोचे कलरओएस वापरणार आहे. तसेच सध्याच्या यूजर्सना देखील कलरओएसवर स्विच करण्याचा पर्याय मिळणार आहे. या सर्वांसोबतच आता टेक कंपनीने अमेरिका आणि युरोपमधील आपले कामकाज पूर्णपणे बंद करण्याची घोषणा देखील केली आहे.

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत

ही घोषणा भारत, अमेरिका आणि युरोपमधील वनप्लसच्या अधिकाऱ्यांनी कम्युनिटी पोस्टद्वारे केली आहे. ओप्पो, वनप्लस आणि रियलमी त्यांच्या स्मार्टफोनच्या व्यवसायाची पुनर्रचना करणार असल्याची चर्चा सुरु असतानाचा आता वनप्लसने हा महत्त्वाचा निर्णय जाहिर केला आहे. कंपनीने केलेल्या या घोषणा वाचवण्यापूर्वी लक्षात ठेवा की, वनप्लसने भारतात त्यांचा व्यवसाय बंद करण्याच्या अफवा फेटाळल्या आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

ऑक्सिजनओएसहून कलरओएसवर करावे लागणार स्विच

वनप्लस इंडिया कम्युनिटी फोरमवरील एका पोस्टमध्ये कंपनीने सांगितलं आहे की, कंपनी कलरओएस 17 अपडेटसह कलरओएसवर शिफ्ट होत आहेत, जे अँड्रॉईड 17 वर आधारित असणार आहे. म्हणजेच सॉफ्टवेअर रिलीज झाल्यानंतर येणारे सर्व नवीन वनप्लस स्मार्टफोन्स थेट कलरओएस 17 वर काम करणार आहेत. सध्या ओप्पो स्मार्टफोन कलरओएस सह लाँच केले जातात. कंपनीचं असं म्हणणं आहे की, जर तुमच्याकडे असा वनप्लस स्मार्टफोन असेल जो भविष्यातील अँड्रॉईड अपडेट्ससाठी पात्र असेल, तुम्हाला ऐच्छिक कलरओएस 17 वर अपडेट करण्याचा पर्याय दिला जाणार आहे.

It’s OFFICIAL!! All the eligible OnePlus devices will get ColorOS 17 update instead of OxygenOS 17 How are feeling about this? pic.twitter.com/RRyHuJGuwx — OP Club (@OnePlusClub) July 16, 2026

वनप्लसचं असं म्हणणं आहे की, या बदलांमुळे सॉफ्टवेयर डेवलपमेंट अधिक सोपे होईल आणि अपडेट्स अधिक वेगाने शेअर केले जाऊ शकतात. या बदलांमुळे यूजर्सना एक ‘जास्त स्टेबल, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज सॉफ्टवेयर अनुभव’ मिळणार आहे. वनप्लसचं असं म्हणणं आहे की, ऑक्सिजनओएस 2021 पासून कलरओएससोबत एकसारखा कोडबेस शेअर करत आहे आणि चीनमध्ये वनप्लस डिव्हाईस आधीपासूनच याचा वापर करत आहेत. इतकंच नाही तर, रियलमी, देखील आपल्या अँड्रॉइड स्किन, रियलमी यूआयसाठीच्या भविष्यातील योजना रद्द करण्याच्या तयारीत आहे. वनप्लसप्रमाणेच, भविष्यात सर्व नवीन रियलमी फोन्स कलरओएस 17 वर चालणार आहेत.

अमेरिका आणि युरोपमधील वनप्लसचे कामकाज बंद

समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, वेगवेगळ्या कम्युनिटी फोरम्सवर करण्यात आलेल्या पोस्ट्समध्ये वनप्लसने कंफर्म केलं आहे की, कंपनी अमेरिका आणि युरोपमधील त्यांचा व्यवसाय बंद करत आहे. कंपनीने म्हटलं आहे की, प्रोजेक्टिव्ह ग्लोबल स्ट्रॅटेजी ॲडजस्टमेंटचा भाग म्हणून दोन्ही प्रदेशांमधील नवीन प्रोडक्ट्सचे रोलआऊट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Samsung चा मोठा धमाका! Flex Titanium तंत्रज्ञानामुळे फोल्डेबल फोन होणार अधिक मजबूत, जाणून घ्या सविस्तर

म्हणजेच, भविष्यात नॉर्थ अमेरिका आणि यूरोपमध्ये कोणतेही नवीन वनप्लस डिव्हाईस लाँच केले जाणार नाहीत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वॉरंटीच्या अटी आणि ग्राहक संरक्षण कायद्यांनुसार विद्यमान वापरकर्त्यांना सपोर्ट सुरू राहील. शिल्लक असलेला स्टॉक उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये विकला जात राहील. भारताप्रमाणेच अमेरिका आणि यूरोपमध्ये देखील यूजर्सना पात्र डिव्हाईसवर कलरओएस 17 मध्ये अपडेट करण्याचा पर्याय मिळणार आहे. तर रिअलमी आता निवडक विदेशी मार्केट्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करणार आहे आणि चीनमध्ये त्यांच्या डिव्हाईसची विक्री बंद करणार आहे.

Web Title: Oneplus ends oxygenos switches to coloros 17 stops new device rollout in us and europe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • oneplus
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: 800 रुपयांहून कमी खर्चात तब्बल 70 दिवसांची वैधता! या जिओ प्लॅनमध्ये मिळणार दररोज 2GB डेटा आणि भरघोस फायदे
1

Jio Recharge Plan: 800 रुपयांहून कमी खर्चात तब्बल 70 दिवसांची वैधता! या जिओ प्लॅनमध्ये मिळणार दररोज 2GB डेटा आणि भरघोस फायदे

Samsung चा मोठा धमाका! Flex Titanium तंत्रज्ञानामुळे फोल्डेबल फोन होणार अधिक मजबूत, जाणून घ्या सविस्तर
2

Samsung चा मोठा धमाका! Flex Titanium तंत्रज्ञानामुळे फोल्डेबल फोन होणार अधिक मजबूत, जाणून घ्या सविस्तर

6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा… Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत
3

6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा… Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत

ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरतील हे 5 Bluetooth डिव्हाईस; रोजची कामं होतील अधिक सोपी
4

ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरतील हे 5 Bluetooth डिव्हाईस; रोजची कामं होतील अधिक सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.