दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज... जाणून घ्या किंमत
कंपनीचं असं म्हणणं आहे की, लाँच करण्यात आलेल्या नवीन मिस्ट टायटॅनियम आणि फ्रॉस्ट सिल्व्हर कलर व्हेरिअंट्समध्ये एका सुधारित मेटॅलिक टेक्स्चरपासून प्रेरित डिझाइन आहे, जी फोनच्या एयरोस्पेस-ग्रेड एल्यूमिनियम फ्रेमसह आणखी जबरदस्त लुक ऑफर करते. कंपनीने यापूर्वी हा स्मार्टफोन सोलर ऑरेंज, डीप ओशन ब्लू आणि मोका ब्राऊन या रंगांच्या पर्यायांत सादर केला होता. त्यानंतर आता हा स्मार्टफोन मिस्ट टायटॅनियम आणि फ्रॉस्ट सिल्व्हर या दोन रंगात देखील खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य: Infinix)
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या इन्फिनिक्स नोट 60 प्रो च्या मिस्ट टायटॅनियम आणि फ्रॉस्ट सिल्व्हर कलर व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन रिटेल स्टोअरवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. लाँच ऑफरअंतर्गत या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना थेट 3,999 रुपयांचा मॅगपॉवर स्पीकर मोफत मिळणार आहे. याशिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर 18 महिन्यांचा गूगल जेमिनी प्रो प्लॅन, 5 टीबी गूगल क्लाउड स्टोरेज, 1 वर्षासाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट, कॅशबॅक ऑफर्स आणि ईएमआय पर्याय देखील मिळतात.
स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करतो. स्मार्टफोनमध्ये JBL-ट्यून डुअल स्टीरियो स्पीकर्स, कोर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन, IP64 रेटिंग, इन-बिल्ट हार्ट रेट आणि SpO₂ सेंसरसारखे अनेक फीचर्स देखील मिळणार आहेत.
या स्मार्टफोनची सर्वात मोठी विशेषत: म्हणजेच याचे ॲक्टिव्ह मॅट्रिक्स डिस्प्ले. हा डिस्प्ले स्मार्टफोनच्या मागील कॅमेरा मॉड्यूलमध्ये इंटीग्रेट करण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये 288 इंडिपेंडेंट एलईडी पिक्सेल देण्यात आले आहेत, जे स्क्रीन बंद झाल्यानंतर नोटिफिकेशन, चार्जिंग स्टेटस, हवामानाची माहिती आणि कस्टम लाइटिंग इफेक्ट्स दाखवतात.
या दमदार स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर देखील मिळणार आहे. गेमिंग आणि अवघड टास्कदरम्यान तापमान नियंत्रित राखण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 3D आइसकोर VC कूलिंग सिस्टीम देखील आहे.
फोटोग्राफी लवर्ससाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP ओआयएस प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यासोबत अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळणार आहे. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये AI एडिटिंग टूल्स, लाईव्ह फोटो आणि 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
स्मार्टफोनमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग, 30W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी दिली आहे.






