OnePlus चा सर्वात स्वस्त फोन (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,या फोनमध्ये 7000mAh ची बॅटरी दिली आहे. त्यामुळे एकदा फोन चार्ज केला की आरामात दोन- तीन दिवस फोन चार्ज करण्याचे नो-टेशन. तसेच यांच्यामध्ये 120Hz चा सारखा मोठा रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला आहे.
तुम्ही जेव्हा फोनवर Instagram, Facebook स्क्रोल कराल किंवा गेम खेळाल, तेव्हा स्क्रीन एकदम स्मूथ चालेल. अजिबात अडकणार नाही. एवढ्या कमी किमतीच्या फोनमध्ये एवढा भारी डिस्प्ले मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे.
आता सगळीकडे AI चा जमाना आहे. वनप्लसने पण या छोट्या फोनमध्ये AI चे नवीन फीचर्स टाकले आहेत फोनची स्पीड वाढवतील, बॅटरी जास्त वेळ चालायला मदत करतील आणि तुम्ही फोन कसा वापरता हे समजून घेऊन फोन अजून चांगला चालेल दरम्यान फोन स्लो होणार नाही.
आता सगळ्यांना प्रश्न आहे की कॅमेरा कसा असेल? तर काही लीक झालेल्या माहितीनुसार, यात दोन किंवा तीन कॅमेरे असू शकतात. मेन कॅमेरा चांगल्या क्वालिटीचा असणार आहे, त्यामुळे फोटो एकदम क्लिअर येतील.आणि प्रोसेसर पण चांगला असणार आहे. 7000mAh बॅटरीला सांभाळेल आणि फोन हँग होणार नाही असा प्रोसेसर कंपनी देणार आहे.
Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
एकंदरीत बघायला गेलं तर OnePlus N6 Lite हा कमी बजेट असणाऱ्या लोकांसाठी एकदम परफेक्ट फोन असणार आहे. वनप्लसची क्वालिटी, मोठी बॅटरी, आणि स्मूथ डिस्प्ले, हे सगळं तुम्हाला कमी किमतीत मिळणार आहे .22 सप्टेंबरला हा फोन भारतात येईल, त्यानंतरच याची खरी किंमत कळेल.
Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी
Online Payment Fraud: सध्या सगळेच ऑनलाईन खरेदी करतात. पण त्याचसोबत सायबर चोर पण खूप वाढले आहेत. मोठा डिस्काउंट दाखवायचा आणि लोकांना फसवायचं, हा त्यांचा नवीन धंदा झाला आहे. तुम्ही लिंकवर क्लिक केला की तुमचं बँक खातं रिकामं.पण घाबरायचं कारण नाही. जर तुम्ही फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही. या 3 गोष्टी कोणत्या आहेत, चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया.






