लवकरच लाँच होणार Oppo चे हे स्मार्टफोन्स, AI फीचर्स आणि 100W SuperVOOC चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
टेक कंपनी Oppo ने त्यांच्या फ्लॅगशिप सीरीज अंतर्गत चीनमध्ये Find X8 आणि Find X8 Pro स्मार्टफोन लाँच केले आहेत. चीनमध्ये या स्मार्टफोन्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीने हे स्मार्टफोन्स ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. Oppo कंपनी नोव्हेंबरमध्ये Find X8 आणि Find X8 Pro स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करणार आहे.
हेदेखील वाचा- तळहाताच्या मदतीने काही क्षणातच होतो पेमेंट, ही आहे चीनची अनोखी पेमेंट टेक्निक! जाणून घ्या सविस्तर
याानंतर काही दिवसांतच हे स्मार्टफोन्स भारतात देखील लाँच केले जाऊ शकतात. त्यामुळे भरतातील Oppo युजर्स Find X8 आणि Find X8 Pro स्मार्टफोनच्या भारतातील एंट्रीची वाट पाहत आहेत. Find X8 सिरीजची नेमकी लाँचिंग तारीख अद्याप कंपनीने जाहीर केली नाही. मात्र ही सिरीज नोव्हेंबरमध्ये लाँच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – X)
नवीन Find X8 सिरीज हॅसलब्लाड मास्टर कॅमेरा सिस्टमसह लाँच करण्यात आली आहे. उत्तम परफॉर्मंससाठी यात MediaTek चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही फोन ColorOS 15 वर आधारित आहेत. यात 80W चार्जिंगला सपोर्ट करणारी मोठी बॅटरी आहे.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये हाय रिझोल्युशन सपोर्टसह LTPO OLED डिस्प्ले आहे. Find X8 ची स्क्रीन 6.59 इंच आहे आणि Find X8 Pro ची स्क्रीन 6.78 इंच आहे. माइक्रो कर्व्ड स्क्रीन 1Hz ते 120Hz च्या अनुकूल रिफ्रेश दर आणि 4,500 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते.
Find X8 आणि Find X8 Pro स्मार्टफोनमध्ये MediaTek डायमेंशन 9400 प्रोसेसर आहे. जे 16GB LPDDR5X RAM आणि UFS 4.0 स्टोरेजसह जोडलेले आहे. परफॉर्मंस सुधारण्यासाठी, यात व्हीसी-कूलिंग सिस्टम प्रदान करण्यात आली आहे. दोन्ही फोन Oppo च्या ColorOS 15 आधारित Android 15 वर चालतात.
हेदेखील वाचा- स्मार्टफोन युजर्ससाठी खुशखबर! OPPO India देतेय स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 लाख रुपये जिंकण्याची संधी
Find X8 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP Sony LYT-700 मुख्य सेन्सर आणि 3x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करणारी टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. Find X8 Pro मध्ये क्वाड कॅमेरा सिस्टम आहे, त्यात 6x पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आहे. दोन्हीमध्ये 120x डिजिटल झूम, हायपर टोन इमेज इंजिन आणि हॅसलब्लॅड पोर्ट्रेट मोड आहे. यात 32 MP Sony IMX615 सेल्फी कॅमेरा आहे.
या दोन्ही स्मार्टफोनमध्ये AI इरेज, AI अँटी रिफ्लेक्शन, AI डी-ब्लर सारखे AI फीचर्स देण्यात आल्या आहेत. Find X8 मध्ये 5,630mAh बॅटरी आहे आणि X8 Pro मध्ये 5,910mAh बॅटरी आहे. दोन्हीमध्ये 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. या स्मार्टफोन्समध्ये 10W रिव्हर्स चार्जिंगसाठीही सपोर्ट आहे. त्यांना पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना IP68 रेटिंग मिळाले आहे. कंपनी त्यांना फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये आणत आहे.