तळहाताच्या मदतीने काही क्षणातच होतो पेमेंट, ही आहे चीनची अनोखी पेमेंट टेक्निक! जाणून घ्या सविस्तर
China palm Payment system: आपला भारत देश डिजीटल इंडियाच्या दिशेने वळत आहे. कॅश बाळगण्यची आणि सुट्या पैशांची कटकट आता संपली असून सर्वचजण डिजीटल पेमेंटच्या दिशेने आपली पावलं उचलत आहेत. आपल्या देशात नंबर किंवा QR कोड स्कॅन करून डिजीटल पेमेंट केलं जातं. यासाठी अनेक UPI ॲप्स किंवा बँकिंग ॲप्सचा वापर केला जातो. आपण QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला पेमेंट करण्याची रक्कम फिल करावी लागते आणि यानंतर पासवर्ड टाकून पेमेंट केला जातो. जवळपास सर्वच देशांमध्ये डिजीटल पेमेंटची ही प्रक्रिया अगदी सारखीच आहे.
हेदेखील वाचा- सतत फोनचा वापर केल्याने डोळे दुखतायत? टेंशन विसरा आणि आत्ताच करा ही सेंटिंग
पण, तुम्ही कधी तुमच्या हाताच्या तळव्यातून ऑनलाइन पेमेंट करताना पाहिले आहे का? होय, तुम्ही ते बरोबर ऐकले. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तळहाताच्या मदतीने पेमेंट केलं जात आहे. हा व्हिडीओ एका पाकिस्तानी कंटेट क्रिएटरने शेअर केला आहे. याला पाम पेमेंट सिस्टम म्हटलं जातं. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर राणा हमजा सैफने हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे, ज्यामध्ये चीनचे नवीन पेमेंट तंत्रज्ञान दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये सैफ त्याच्या मित्रांसोबत किराणा दुकानात जातो. इथेच त्याचा एक मित्र त्याच्या तळहाताच्या मदतीने पेमेंट करतो. या पेमेंट टेक्निकमुळे त्याचे बाकीचे मित्र आश्चर्यचकित झाले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, एकदा तुमच्या तळहातावरील रेषा रजिस्टर झाल्यानंतर, तुम्ही चीनमध्ये कुठेही सहज पेमेंट करू शकता .
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. लोक हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हे तंत्रज्ञान ऑनलाइन पेमेंटचा मार्ग पूर्णपणे बदलू शकते आणि ते खूप सोपे आणि मजेदार बनवू शकते.
हेदेखील वाचा- स्मार्टफोन युजर्सची स्कॅमर्सपासून होणार सुटका, गूगलने एकाच वेळी लाँच केले पाच नवीन फीचर्स
या व्हिडिओंवर लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ तीन लाखांहून अधिक वेळा शेअर झाला आहे. या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. लोक या तंत्रज्ञानाची प्रशंसा करत आहेत आणि भविष्यात पेमेंटची नवीन पद्धत म्हणून संबोधत आहेत. चीन आपल्या नवनवीन शोधांनी लोकांना आश्चर्यचकित करत आहे. चीनमध्ये केवळ हात हलवून पैसे कसे दिले जातात हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ चीनच्या जुझोउ शहरात बनवण्यात आला आहे.
फक्त सैफचा व्हिडिओच नाही तर याआधीही पाम पेमेंट सिस्टमचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. यापूर्वी आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनीही त्यांच्या एक्स हँडलवर असाच एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये एका महिलेने बीजिंग मेट्रोमध्ये आपल्या तळहाताच्या मदतीने पैसे देऊन लोकांना आश्चर्यचकित केले. महिलेने त्यांना सांगितले की चीनमध्ये कॅशलेस पेमेंटचा प्रसार खूप वेगाने झाला आहे. येथे लोक QR कोड आणि चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान खूप वापरत आहेत. आता पामद्वारे पेमेंट करण्याचे तंत्रज्ञान देखील लोकांमध्ये वेगाने पसरत आहे.