Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

13 इंचाचा डिस्प्ले आणि 13000mAh ची तगडी बॅटरी! मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार ‘हा’ नवीन टॅबलेट, फीचर्स झाले लीक

'ओप्पो' (OPPO) लवकरच आपला नवीन फ्लॅगशिप टॅबलेट 'Oppo Pad 5 Pro' लाँच करण्याच्या तयारीत आहे. या टॅबलेटचे काही खास स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक झाले असून, तो बाजारातील आतापर्यंतचा सर्वात दमदार मॉडेल ठरू शकतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 15, 2026 | 05:22 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • OPPO नवीन ‘Oppo Pad 5 Pro’ लाँच करण्याच्या तयारीत
  • मोठी १३,००० mAh बॅटरी असण्याची अपेक्षा
  • मोठ्या बॅटरीसोबतच टॅबलेटमध्ये मोठा डिस्प्ले
Oppo Pad 5 Pro spec leak: जर तुम्हीही स्मार्ट आणि फास्ट टॅबलेटच्या शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टेक जगतातील मोठी कंपनी ‘ओप्पो’ (OPPO) लवकरच आपला नवीन फ्लॅगशिप टॅबलेट ‘Oppo Pad 5 Pro’ लाँच करण्याच्या तयारीत आहे. या टॅबलेटचे काही खास स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक झाले असून, तो बाजारातील आतापर्यंतचा सर्वात दमदार मॉडेल ठरू शकतो. या टॅबलेटमध्ये मोठी १३,००० एमएएच बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ असा की जर तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास नको असेल आणि दीर्घ बॅटरी लाइफ असलेला टॅबलेट शोधत असाल, तर ओप्पोचा हा येणारा टॅबलेट परिपूर्ण पर्याय असू शकतो. मोठ्या बॅटरीसोबतच, टॅबलेटमध्ये मोठा डिस्प्ले आणि तगडी रॅम देखील असेल.

Jio आणि Airtel दोन्ही कंपन्यांचा 1199 रुपयांचा प्लॅन, पण ‘ही’ कंपनी देतेय 35000 रुपयांपेक्षा जास्त फायदा!

मोठा आणि चमकदार डिस्प्ले

मिळालेल्या माहितीनुसार, या टॅबलेटमध्ये १३.२ इंचाचा एक मोठा डिस्प्ले असेल. हा टॅबलेट ‘अँड्रॉइड’ विभागात सर्वात मोठ्या स्क्रीन असलेल्या डिव्हाइसेसपैकी एक असेल. हाय रिझोल्यूशन आणि उत्तम रिफ्रेश रेटमुळे चित्रपट पाहणे किंवा गेमिंग करणे हा एक वेगळाच अनुभव ठरणार आहे.

सुपरफास्ट परफॉर्मन्स

या टॅबलेटला क्वालकॉमचा शक्तिशाली ‘स्नॅपड्रॅगन ८ एलीट जेन ५’ प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा मल्टीटास्किंग अत्यंत स्मूथ आणि वेगाने करता येणार आहे. यात १६ जीबीपर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत स्टोअरेजचे पर्याय मिळतील. त्यामुळे स्टोअरेजची चिंता मिटली. तुम्हाला हवी तेवढी रॅम यात वापरता येते.

बॅटरीचा बाप

या टॅबलेटचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याची १३,०००mAh ची महाकाय बॅटरी. यामुळे वारंवार चार्जिंगचा झंझट कायमचा मिटणार आहे. यात ६७ वॅटची फास्ट चार्जिंग सुविधा असेल, जी मोठ्या बॅटरीलाही लवकर चार्ज करण्यास मदत करेल.

कॅमेरा आणि इतर फीचर्स

डॉक्युमेंट स्कॅनिंग आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सेलचा फ्रंट आणि १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फोटोसोबतच इतर आवश्यक गोष्टींसाठी हा टॅबलेट चांगला ऑपशन आहे.

लाँच कधी होणार?

लीक झालेल्या माहितीनुसार, हा टॅबलेट एप्रिल २०२६ च्या आसपास मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. कदाचित ओप्पो आपल्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनसोबतच याला लाँच करणार असल्याची शक्यता आहे.

जर तुम्हालाही अभ्यासासाठी, ऑफिसच्या कामासाठी किंवा मनोरंजनासाठी एक हाय-एंड टॅबलेट हवा असेल, तर ‘Oppo Pad 5 Pro’ एक उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याच्या मोठ्या स्क्रीनमुळे आणि शक्तिशाली बॅटरीमुळे हा टॅबलेट लॅपटॉपलाही तगडी टक्कर देऊ शकेल.

Elon Musk यांच्या ‘सुपरइंटेलिजन्स’ मिशनमध्ये भारतीयाची एन्ट्री! कोण आहेत देवेंद्र सिंह चपलोत?

Web Title: Oppo pad 5 pro tipped to come with 13 inch display 13000mah battery and more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • Tech News
  • technology news

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.