POCO X7 Series: जबरदस्त Durability सह पोको कंपनीची X7 सिरीज लाँच!
नुकताच C75 हा जगातील सर्वात स्वस्त ५ जी फ़ोन लॉंच केल्यावर आता पोको कंपनीने आणखी २ फ़ोन भारतात आणले असून मिड बजेटमधे असणारे हे फ़ोन सूपर फीचर्ससह टिकाऊ ही आहेत. विशेष म्हणजे X7 आणि X7 Pro हे दोन्ही डिवाइस वॉटरतसंच डस्ट अशा दोन्ही प्रकारच्या अनेक टेस्ट मधे अगदी खरे उतरलेत. लूकचा विचार केल्यास दोन्ही फोनला मॅट फिनिश आहे. तसंच X7 मधे सिल्व्हर, एनचेंटेड ग्रीन आणि ब्लॅक आणि यलो कॉम्बिनेशन हे तीन कलर आहेत. तर X7 प्रो मध्ये नेबुला ग्रीन, यलो आणि ब्लॅक रंग कॉम्बिनेशन मिळणार आहे.
डिस्प्ले
डिस्प्लेबद्दल बोलायचं तर पोको X7 मध्ये 6.67-इंच 1.5K 3D एमोलेड कर्व्ह डिस्प्ले आहे, तर X7 प्रो मध्ये फ्लॅट डिस्प्ले आहे. दोन्ही फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 लेयर प्रोटेक्शन असल्यामुळे हे फ़ोन जबरदस्त ड्युरेबल असल्याचा कंपनीचा म्हणणं आहे .
WhatsApp चे कमालीचे फिचर, या ट्रिकने क्षणार्धात कळेल कोण करत तुम्हाला ट्रॅक
कॅमेरा
आम्ही तुम्हाला सांगतो की, यात X7 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे तर X7 Pro मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. दोन्ही फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा AI कॅमेरा आहे आणि तो सोनीच्या LYT-600 सेन्सरसह येतो. 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा लेन्स आहे. X7 मध्ये 2MP मॅक्रो लेन्स देखील आहेत.
प्रोसेसर
याच्या प्रोसेसरचा विचार केल्यास X7 मध्ये मीडियाटेक डायमेंशन 7300 अल्ट्रा SoC प्रोसेसर असून X7 प्रो मध्ये सर्वात खास चिपसेट आहे. कार्यक्षमतेसाठी, यात मीडियाटेक डायमेंशन 8400 अल्ट्रा प्रोसेसर दिला आहे, तसंच X7 मध्ये 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेजचा पर्याय आहे. तर X7 प्रो मध्ये 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 512GB स्टोरेज आहे.
बॅटरी
बॅटरीबद्दल बोलने केले तर X7 मध्ये 5,500mAh बॅटरी असून X7 प्रो मध्ये 6,550mAh बॅटरी आहे. दोन्हीत फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठीचा म्हणाल तर दोन्ही फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड ट्रे असेल, परंतु एसडी कार्ड स्लॉट नाही. तसंच ड्युअल सिम 5G, 4GLTE, WIFI, ब्लूटूथ 5.2 सारखे अनेक फीचर्स आहेत.
किती आहे किंमत?
किमतीचा विचार केल्यास X7 ची किंमत ₹24,999 तर X7 प्रो ची किंमत ₹31,999 इतकी असून दोन्हीत दोन वेरियंट दिले गेले आहेत. दोन्ही फ़ोन सध्या फ्लिपकार्टवर मिळणार असून पोको X7 प्रो ची विक्री 14 जानेवारीपासून सुरू होईल आणि X7 ची विक्री 17 जानेवारीपासून सुरू होईल.