भारतात रियलमी 11 (Realme 11) सीरीजमधील Realme 11 5G आणि Realme 11X 5G स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत. तसेच Realme Buds Air 5 Pro आणि Buds Air 5 true wireless earbuds देखील लाँच करण्यात आले आहेत.
स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचं तर रियलमी 11 स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. रियलमी 11 एक्स 5जी फोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरामध्ये 2 एक्स इन-झूम फीचर आहे.
Realme 11 5G ची किंमत
Realme 11 5G मध्ये 8 जीबी रॅम आहे. फोनचं 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 18,999 रुपये तर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोन Glory Gold आणि Glory Black कलर ऑप्शनसह उपलब्ध झाला आहे. याची विक्री 29 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून Realme आणि Flipkart वर सुरु होईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाँच ऑफर अंतगर्त खरेदी करताना 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
Realme 11X 5G ची किंमत
Realme 11X 5G फोनचे दोन व्हेरिएंट आले आहेत. त्यातील 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर 8जीबी रॅम 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. या फोनसाठी Purple Dawn आणि Midnight Black असे दोन कलर ऑप्शन्स आहेत. याची विक्री 30 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. लाँच ऑफरमध्ये फोनवर 1,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
Realme 11 5G चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी 11 5जी स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच फुलएचडी+ डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश 120 हर्ट्झ आणि रिजोल्यूशन 2400×1080 पिक्सेल आहे. तसेच, हा फोन MediaTek Dimensity 6100+ 5G प्रोसेसरसह बाजारात आला आहे. जोडीला 8 जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यात ३एक्स इन-सेन्सर झूम आहे. सोबत 2 मेगापिक्सेलचा पोट्रेट कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी असून ती 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme 11X 5G चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी 11 एक्स 5जी स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश 120 हर्ट्झ आणि रिजोल्यूशन 2400×1080 पिक्सेल आहे. हा फोनदेखील MediaTek Dimensity 6100+ 5G प्रोसेसरसह येतो. सोबत 8 जीबीपर्यंत रॅम आणि128 जीबी स्टोरेजची सोय आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. त्याचबरोबर एक 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. फोनची बॅटरी 5000एमएएचची आहे, जोडीला 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.