
7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा... Realme चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच; वाचा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
ई-मेल आयडी प्रोफेशनल नाही? चिंता नको! आता क्षणातच बदलू शकता तुमचे यूजरनेम, फक्त फॉलो करा या स्टेप्स
Realme 16 5G स्मार्टफोन 8GB+128GB, 8GB+256GB आणि 12GB+256GB या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8GB+128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 31999 रुपये, 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये आणि 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 36,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने हा लेटेस्ट स्मार्टफोन एअर ब्लॅक आणि एअर व्हाईट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ऑनलाईन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या ऑनलाईन स्टोअरवरून खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनची विक्री 5 एप्रिलपासून सुरु होणार आहे. ऑफरबद्दल बोलायचं झालं तर Realme 16 5G स्मार्टफोन 12 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शनसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, विविध बँका या फोनवर 2000 रुपयांपर्यंतची सूट देत आहेत. तसेच, तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यावर 6000 रुपयांपर्यंतचा बोनसही दिला जात आहे. (फोटो सौजन्य – X)
Realme 16 5G स्मार्टफोनमध्ये 6.57-इंचाचा फुल एचडी+ (1,080×2,372 पिक्सेल) ऐमोलेड डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे.
Made for portraits that deserve a closer look.
Step into the spotlight with the #AIPortraitStar and @vickykaushal09. The all new #realme16 5G is finally here!
Starting from ₹28,999*
Pre-book now! Know more:https://t.co/Q9dfBZeCWHhttps://t.co/tYvtOuB21s pic.twitter.com/3W2sSmBcdn — realme (@realmeIndia) April 2, 2026
Realme 16 5G स्मार्टफोन मीडियाटेक डाइमेंसिटी 6400 टर्बो प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन कंपनीने 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 2.2 इंटरनल स्टोरेजसह बाजारात लाँच केला आहे. हीट मॅनेजमेंटसाठी या स्मार्टफोनमध्ये 6,050mm sq हीट डिस्सपेशन एरिया दिला हे. या फोनची आईपी रेटिंग IP69 आहे. रियलमीचा लेटेस्ट फोन अँड्रॉईड 16 वर आधारित रिअलमी UI 7.0 वर चालतो. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या फोनला चार वर्षांसाठी तीन अँड्रॉइड अपडेट्स आणि सुरक्षा अपडेट्स दिले जातील.
Realme 16 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे, जो वाईड अँगल सेंसर आहे आणि याचे अपर्चर f/1.8 आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम सेंसर दिला आहे. रियर कॅमेरा मॉड्यूलमध्ये एक छोटा आरसा दिला आहे. याच्या मदतीने यूजर्स रिअर कॅमेऱ्यामधून देखील सेल्फी फोटो क्लिक करू शकणार आहेत. या स्मार्टफोनच्या पुढील बाजूला 50-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
कनेक्टिविटीबद्दल बोलायचं झालं तर Realme 16 5G मध्ये ब्लूटूथ 5.3, 5जी, 4जी एलटीई, बेईडू, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस, यूएसबी टाइप-सी आणि वाय-फाय 6 सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील दिला आहे.
Realme 16 5G मध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन 60W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनच्या मदतीने बड्स किंवा स्मार्टवॉच देखील चार्ज केले जाऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.