तुमचं BSNL सिम कार्ड ब्लॉक होणार आहे... तुम्हालाही आलाय असा मॅसेज? थांबा, पीआयबीने उघड केलेलं सत्य वाचा
स्कॅम आणि फ्रॉडच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी अनेक नवीन मार्गांचा वापर करत असतात. स्कॅमर्स अशा काही पद्धतींचा वापर करतात, ज्यामुळे लोकांमध्ये भिती निर्माण होते आणि लोकं स्कॅमर्सच्या बोलण्याला बळी पडतात. आता देखील अशाच काही घटना समोर आल्या आहेत. स्कॅमर्स सध्या BSNL युजर्सना टार्गेट करत आहेत. स्कॅमर्स BSNL युजर्सना काही नोटीस पाठवत आहेत, ज्यामध्ये सांगितलं जात आहे की, युजर्सनी केवायसी अपडेट केली नाही तर कंपनी त्यांचं सिम कार्ड ब्लॉक करेल.
BSNL चा हा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीआयबीने या नोटीसचं सत्य समोर आणलं आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने लोकांना याबद्दल सतर्क केले आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट करत सध्या सुरु असलेल्या BSNL स्कॅमबद्दल लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्कॅमर्सनी पाठवलेल्या या नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) तुमचे सिम केवायसी निलंबित केलं जाणार आहे. तुमचे सिम कार्ड 24 तासांच्या आत ब्लॉक केले जाणार आहे. नोटीसमध्ये केवायसी एक्झिक्युटिव्हचे नाव आणि संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे. लोकांना या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Have you also received a notice purportedly from BSNL, claiming that the customer’s KYC has been suspended by @TRAI and the sim card will be blocked within 24 hrs❓#PIBFactCheck
❌ Beware! This Notice is #Fake.
✅ @BSNLCorporate never sends any such notices. pic.twitter.com/yS8fnPJdG5
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 23, 2025
स्कॅमर्सनी पाठवलेल्या या नोटीसवर पीआयबी फॅक्ट चेकिंग युनिटने प्रतिक्रिया देत एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये पीआयबी फॅक्ट चेकिंग युनिटने ही नोटीस बनावट असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने म्हटले आहे की ही नोटीस बनावट आहे. बीएसएनएल कधीही अशा सूचना पाठवत नाही.
आजकाल स्कॅमर डेटा चोरी आणि आर्थिक फसवणूकीसाठी लोकांना असे बनावट ईमेल आणि सूचना पाठवत आहेत. काही दिवसांपूर्वी, इंडियन पोस्टच्या लकी ड्रॉबाबत सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली जात होती. अशा घोटाळ्यांपासून सावध राहण्यासाठी आणि आपला बचाव करण्यासाठी, खबरदारी घेणे महत्वाचे आहे.
Vivo उडवणार सर्वांची झोप, लवकरच घेऊन येणार पावरफुल स्मार्टफोन! बजेट किंमतीत मिळणार हे स्पेशल फीचर्स