मुंबई, १४ जून २०२६ : सॅमसंग इंडियाने आज फुटबॉल चाहत्यांसाठी आपल्या व्हिजन एआय बिग टीव्हींवर विशेष ऑफर्स जाहीर केल्या. ‘बिग गेम, बिगर स्क्रीन, बिगेस्ट मोमेंट्स’ ही मोहीम फुटबॉल चाहत्यांना एआय सॉकर मोड असलेल्या सॅमसंग व्हिजन एआय टीव्हींच्या माध्यमातून खेळाचा थरार आपल्या घरी आणण्याची संधी देते.
सॅमसंगच्या २०२६ मधील व्हिजन एआय टीव्ही श्रेणीमध्ये उपलब्ध असलेला हा एआय सॉकर मोड फुटबॉलचा चेंडू अधिक स्पष्टपणे फिरताना दिसण्यासाठी, आकर्षक रंगसंगतींसाठी आणि स्टेडियमसारखाच उत्कृष्ट आवाज देण्यासाठी रिअल-टाइम सीन्सचे विश्लेषण करून फुटबॉल पाहण्याचा आनंद वाढवतो.
सॅमसंगचा व्हिजन एआय कम्पॅनियन (व्हीएसी) बिक्स्बी, परप्लेक्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलट यांसारख्या एआय प्लॅटफॉर्म्सना एकत्र जोडतो. हा टीव्ही एआय अपस्केलिंग प्रोद्वारे कमी रिझोल्यूशन असलेल्या कंटेंटची गुणवत्ता, डेप्थ आणि कॉन्ट्रास्ट सुधारून वैयक्तिकृत टीव्ही पाहण्याचा अनुभव देतो. यामधील कलर बूस्टर प्रो प्रत्येक सीनमधील रंग अधिक सुयोग्य करून नैसर्गिकरित्या जिवंत बनवते, तर एआय साऊंड कंट्रोलर प्रो कॉमेंट्री, संगीत आणि प्रेक्षकांच्या आवाजात योग्य ताळमेळ साधून विशाल व स्पष्ट आवाज प्रदान करतो.
सॅमसंगकडून ‘द बिग बीस्पोक एआय फेस्ट’ची घोषणा; होम अप्लायन्सेस श्रेणीवर आकर्षक समर ऑफर्स!
या ऑफर्सचा भाग म्हणून, ग्राहकांना खरेदी केलेल्या मॉडेलनुसार ९२,९९० रुपयांपर्यंतचा साऊंडबार किंवा २,१४,९९० रुपयांपर्यंतचा टीव्ही मोफत मिळणार आहे. ही डिल अधिक फायदेशीर करण्यासाठी, सॅमसंग २० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, झीरो डाऊन पेमेंट पर्याय आणि ३० महिन्यांपर्यंतचे ईएमआय प्लॅन्स देत आहे.
आकार ७५ इंचांपेक्षा जास्त असलेले सॅमसंग व्हिजन एआय बिग टीव्ही सॅमसंग टीव्ही प्लस, सॅमसंग केअर+, सॅमसंग फायनान्स+, साऊंड प्लस, आर्ट प्लस आणि सात वर्षांचे ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊन भविष्यासाठी सज्ज संपूर्ण मनोरंजनाचा अनुभव देतात. ग्राहक व्हिजन एआय बिग टीव्हीची ही श्रेणी एक्सप्लोअर करू शकतात आणि सॅमसंग इंडियाच्या रिटेल स्टोअर्समध्ये व ऑनलाइन चॅनेल्सवर या विशेष ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.






