Samsung चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लाखो रुपयांचा स्मार्टफोन केवळ इतक्या किंमतीत; Flipkart वर मिळतेय बंपर ऑफर
स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना
खरं तर टेक कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा स्मार्टफोन भारतात 1,29,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता या स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. फ्लिपकार्टवर सध्या या डिव्हाईसचे टायटॅनियम ग्रे, 256 GB स्टोरेज आणि 12 GB रॅम असलेले व्हेरिअंट 89,930 रुपयांच्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना थेट 40,069 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जाणार आहे. थेट डिस्काऊंट व्यतिरिक्त फ्लिपकार्ट ॲक्सिस आणि फ्लिपकार्ट एसबीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करून ग्राहकांना किंमतीवर आणखी 4 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
ज्या लोकांना एकदाच पूर्ण पेमेंट करणं शक्य नाही, अशा लोकांसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ईएमआय पर्याय देखील ऑफर करणार आहे. ईएमआयची किंमत 3,162 प्रति महीनापासून सुरु होणार आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट एक्सचेंज प्रोग्राम देखील तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. तुमच्या जुन्या डिव्हाइसचा ब्रँड, मॉडेल आणि त्याची कार्यस्थिती यानुसार तुम्हाला 67,450 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज मूल्य मिळू शकते. लक्षात ठेवा की, या ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी आणि स्टॉकच्या उपलब्धतेवर अवलंबून आहेत.
या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट वाला 6.9-inch QHD+ डायनॅमिक अमोलेड 2X पॅनल मिळणार आहे. स्मार्टफोनच्या इंटरनल स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट देण्यात आला आहे, जो गेमिंग, मल्टीटास्किंग आणि एआय फीचर्ससाठी अतिशय दमदार मानला जातो. या डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे.
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्या सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 200 मेगापिक्सेलचा मुख्य सेंसर, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड, 5x ऑप्टिकलझूमसह 50MP टेलीफोटो आणि 10 मेगापिक्सेलचा 3x टेलीफोटो लेंस मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. जर तुम्हाला उत्कृष्ट बनावटीचा दर्जा (बिल्ड क्वालिटी), उत्तम कॅमेरा आणि दीर्घकाळापर्यंत मिळणारे सॉफ्टवेअर अपडेट्स असलेला फोन हवा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.






