Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर

Samsung Messages App: सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या युजर्ससाठी मोठा बदल जाहीर केला आहे. आता कंपनीचे जुने सॅमसंग मेसेज अ‍ॅप हळूहळू बंद होणार असून युजर्सना गूगलच्या गूगल मेसेजकडे वळावे लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 06, 2026 | 10:43 AM
Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार 'हे' मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर

Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार 'हे' मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • जुलै 2026 पासून सॅमसंग मेसेज अ‍ॅप अमेरिकेत टप्प्याटप्प्याने बंद होईल, आणि नंतर गॅलेक्सी स्टोअर मधूनही हटवले जाईल.
  • अँड्रॉईड 12 आणि पुढील वर्जनवरील युजर्सना गूगल मेसेज वापरण्याचा सल्ला, कारण त्यात आरसीएस, स्पॅम फिल्टर आणि एआय स्कॅम अलर्ट यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये मिळतील.
  • गॅलेक्सी S26 सारख्या नव्या डिव्हाइसमध्ये सॅमसंग मेसेज आधीच डिफॉल्ट नसणार, म्हणजे भविष्यातील सॅमसंग फोन पूर्णपणे गूगल इकोसिस्टमकडे जात आहेत.
टेक कंपनी सॅमसंगने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम सॅमसंग स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येक यूजरवर होणार आहे. कंपनीने निर्णय घेतला आहे की, येत्या काहीच दिवसांत कंपनी सॅमसंग मेसेजिंग मोबाईल अ‍ॅप बंद करणार आहे. याबाबत घोषणा देखील करण्यात आली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, जुलै 2026 पर्यंत अमेरिकेत कंपनी त्यांचे मेसेजिंग अ‍ॅप टप्प्याटप्प्याने बंद करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, या निर्णयाने यूजर्सना गूगल मेसेजवर शिफ्ट होण्यासाठी प्रेरित केले जात आहे. तसेच कंपनीने स्पष्ट केले आहे की, सॅमसंग मेसेजिंग मोबाईल अ‍ॅप जुलै 2026 पासून अधिकृतपणे बंद केले जाणार आहे.

उत्तरपत्रिका तपासणीत AI ची एंट्री! CBSE ने सुरू केली ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणाली, विद्यार्थ्यांसाठी बदलणार मूल्यांकनाची पद्धत

जर तुम्ही अँड्रॉईड 12 किंवा त्यापेक्षा हाय एंड लेव्हल डिव्हाईसचा वापर करत असाल तर तुम्हाला याबाबत नोटिफिकेशन पाठवले जाणार आहे. जुलै महिन्यानंतर, सॅमसंग मेसेजेस फक्त आपत्कालीन संदेशांसाठीच काम करेल आणि गॅलेक्सी स्टोअरमधून काढून टाकले जाईल. जुलै 2026 नंतर हा अ‍ॅप गॅलेक्सी स्टोअरमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असणार नाही. तर गॅलेक्सी एस 26 चा वापर करणाऱ्या यूजर्सना आधीच सॅमसंग मेसेज अ‍ॅप डाउनलोड करण्यापासून थांबवण्यात आले आहे. कंपनीने हा निर्णय अँड्रॉईड 12 आणि नवीन वर्जन वापरणाऱ्या गॅलेक्सी यूजर्ससाठी घेतला आहे. याबाबत सॅमसंगच्या अमेरिकेतील साईटवर सूचना देखील देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

टेक्स्टिंगचा अनुभव सुधारण्याचा कंपनीचा प्रयत्न

अँड्रॉईड 14 आणि त्यानंतरच्या वर्जनवर स्विच केल्यानंतर गूगल मेसेज आयकॉम आपोआप होम स्क्रीन डॉकवर ट्रांसफर होणार आहे. मात्र यामुळे 2022 पूर्वीच्या डिव्हाईसवर परिणाम होणार नाही. या बदलानंतर यूजर्सना एआई स्कॅम अलर्ट, उत्तम स्पॅम फिल्टर, अँड्रॉइडवर RCS मेसेजिंग, उत्तम ग्रुप चॅट आणि सोपे मीडिया शेयरिंग सारख्या सुविधा मिळणार आहेत. याचा उद्देश टेक्स्टिंगचा अनुभव सुधारण्याचा आहे. कंपनीने घेतलेला हा निर्णय त्यांच्या स्टँडर्डाइजेशन प्रोसेसचा एक भाग असल्याचे सांगितलं जात आहे. सॅससंग त्यांच्या स्पेशल मेसेजिंग सिस्टिमला बंद करून गूगलच्या इकोसिस्टमचा वापर करणार आहे, जे यूजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे विविध कंपन्यांच्या डिव्हाईसवर मेसेजिंगचा अनुभव म्हणजेच क्रॉस-डिवाइस कंसिस्टेंसी एकसारखी असेल. गूगल मेसेजेस रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस (RCS) साठी सुधारित सपोर्ट देखील देते.

Honor ने पुन्हा केला धमाका! 12GB रॅम आणि 7,000mAh बॅटरीसह नवा 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत

असं सांगितलं जात आहे की, या बदलादरम्यान RCS चॅटमध्ये काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र जेव्हा दोन्ही यूजर्स गूगल मेसेजेसचा वापर करतील तेव्हा ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीने त्यांच्या यूजर्सना सॅमसंग मेसेजिंग अ‍ॅपवरून गुगल मेसेजवर स्विच करण्याचा सल्ला दिला आहे. याची प्रोसेस अतिशय सोपी आहे.

  • गुगल मेसेजेस ॲप उघडा किंवा इंस्टॉल करा.
  • अ‍ॅपमधील “डीफॉल्ट एसएमएस अ‍ॅप सेट करा” या पर्यायावर टॅप करा आणि गूगल मेसेजेस निवडा.
  • अँड्रॉइड 12 किंवा 13 यूजर्सना त्यांच्या डॉकमधून सॅमसंग मेसेजेस काढून टाकावे लागेल आणि गूगल मेसेजेस तिथे (मॅन्युअली) ड्रॅग करून सेट करावे लागेल.

Web Title: Samsung will shut this messaging app in us from this date what is the reason behind it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
2

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
3

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
4

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.