फोटो सौजन्य - vutvs
Vu Televisions ने भारतात नवीन स्मार्ट टिव्ही सिरीज लाँच केली आहे. Vu ने Vu VIBE QLED SMART TV लाँच केला आहे. हा स्मार्ट टिव्ही जबरदस्त साउंड क्वालिटी आणि भन्नाट फीचर्ससह भारतात लाँच करण्यात आला आहे. हा टीव्ही Vu डिझाइन सेंटरमध्ये विकसित करण्यात आला आहे. Vu VIBE QLED TV इंटिग्रेटेड साउंडबारसह येणारा जगातील पहिला टीव्ही आहे. हा साउंडबार थेट टीव्ही ॲम्प्लीफायर सर्किटशी जोडलेला आहे. ज्यामुळे युजर्सना उत्तम साउंड क्वालिटी मिळते. या सीरिजमध्ये 43 इंच ते 65 इंचापर्यंतचे मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. चला तर मग पाहूया या Vu VIBE QLED SMART TV चे फीचर्स आणि किंमत.
हेदेखील वाचा- TRAI अधिकाऱ्याच्या नावाने केली ऑनलाईन फसवणूक; व्यवसायिकाला 90 लाखांचा गंडा
Vu VIBE QLED SMART TV हा Vu डिझाइन सेंटरमध्ये विकसित करण्यात आला आहे. हा टीव्ही तीन बाजूंच्या बेझल-लेस डिझाइनसह येतो. हा टिव्ही ग्लॉसी ब्लॅक कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. टीव्ही वॉल आणि टेबल माउंट दोन्हीसह येतो. तुम्ही हा टिव्ही भिंतीवर लावून किंवा टेबलावर कुठेही ठेवून वापरू शकता.
Vu VIBE QLED SMART TV मध्ये 4K QLED तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. QLED डिस्प्ले आहे, जो 4K/QLED टीव्हीपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. QLED तंत्रज्ञान रंग अचूकता आणि कॉन्ट्रास्ट सुधारण्यासाठी क्वांटम डॉट्स वापरते. Vu VIBE QLED TV चा डिस्प्ले 400 Nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. यामध्ये HDR10, HLG, गेम मोड, AI पिक्चर बूस्टर, डायनॅमिक कॉन्ट्रास्ट सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. टीव्ही क्वाड-कोअर एआय प्रोसेसरसह येतो. यासोबतच यामध्ये Vu ActiVoice रिमोट उपलब्ध आहे, जो व्हॉईस सर्चसह येतो. यावर तुम्हाला क्रिकेट आणि सिनेमा मोड मिळतात.
हेदेखील वाचा- Vivo Y18i vs POCO F6: कोणता फोन देईल तुम्हाला बेस्ट फीचर्स; वाचा सविस्तर
टीव्हीमध्ये 16GB स्टोरेज आणि 2GB रॅम आहे. हा टीव्ही 88W साउंड बारसह येतो. हा टीव्ही Google TV OS वर काम करतो. हा साउंडबार थेट मदरबोर्डच्या ॲम्प्लीफायर सर्किटशी जोडलेला आहे, जो स्वच्छ आवाज आउटपुट देतो. Vu VIBE QLED TV इंटिग्रेटेड साउंडबारसह येणारा जगातील पहिला टीव्ही आहे. हा साउंडबार थेट टीव्ही ॲम्प्लीफायर सर्किटशी जोडलेला आहे. ज्यामुळे युजर्सना उत्तम साउंड क्वालिटी मिळते.
Vu VIBE QLED SMART TV सीरिजमध्ये 43 इंच ते 65 इंचापर्यंतचे मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये 43-इंच, 50-इंच, 55-इंच आणि 65-इंच या मॉडेल्सचा समावेश आहे. Vu VIBE QLED TV ची किंमत 43-इंचाच्या मॉडेलसाठी 30,999 रुपयांपासून सुरू होते. त्याच्या 50-इंच व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे. तर 55-इंच व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये आणि 65-इंच मॉडेलची किंमत 58,999 रुपये आहे. तुम्ही हा टीव्ही Amazon.in आणि इतर मोठ्या रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकाल.