POCO आणि Vivo या दोन्ही कंपन्यांनी त्यांचे नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच केले आहेत. POCO ने Deadpool Limited Edition POCO F6 आणि Vivo ने Vivo Y18i भारतात लाँच केला आहे. पण या दोन्हीपैकी तुमच्यासाठी कोणता फोन बेस्ट ठरणार आणि कोणता फोन तुम्हाला पैसेवसूल फीचर्स देणार, पाहूया.
फोटो सौजन्य- vivo and poco
Deadpool Limited Edition POCO F6 12GB रॅम आणि 256GB सह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये Snapdragon 8s Gen 3 चिरसेट आहे. POCO F6 मध्ये 6.67 इंचाचा 1.5K 120Hz एमोलेड डिस्प्ले आहे. यामध्ये 24,000 निट्स ब्राइटनेस आहे.
Deadpool Limited Edition POCO F6 मध्ये 50MP OIS Sony IMX882 कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. लिमिटेड एडिशनमध्ये काळ्या किनाऱ्यासह गडद लाल बॅक पॅनल आहे. तसेच यात डेडपूल आणि व्हॉल्व्हरिन डिझाइन देखील आहे.
Deadpool Limited Edition POCO F6 ची किंमत 29,999 रुपये आहे, ज्यामध्ये 4,000 रुपयांची बँक ऑफर समाविष्ट आहे. ऑफेरशिवाय या स्मार्टफोनची किंमत 33,999 रुपये आहे. POCO F6 स्मार्टफोन 7 ऑगस्टपासून Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Vivo Y18i 4G स्मार्टफोन एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यात HD+ डिस्प्लेसह 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14-आधारित Funtouch OS 14 वर चालतो. Vivo Y18i मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 1,612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला LCD डिस्प्ले आहे.
Vivo Y18i मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे. Vivo Y18i च्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13-MP प्रायमरी सेन्सर आणि 0.08-MP सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. यात फ्रंटला 5 MP सेन्सर आहे. फोनमध्ये ब्लूटूथ 5.1, BeiDou, GLONASS, Galileo, OTG, FM Radio आणि USB 2.0 पोर्टचा समावेश आहे.
Vivo Y18i मध्ये Unisoc चिपसेट आहे. Vivo Y18i केवळ 7,999 रुपयांमध्ये Vivo च्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. फोन जेम ग्रीन आणि स्पेस ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.