Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? चार्जरनंतर आता बॉक्समधून गायब होणार ही एक्सेसरी, ‘या’ कंपनीने सुरु केला धक्कादायक ट्रेंड

वाढता ई-कचरा आणि स्मार्टफोन कंपन्यांचा खर्च कमी करणं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आात स्मार्टफोन कंपन्या लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आता चार्जरनंतर बॉक्समधून आणखी एक एक्सेसरी गायब होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 07, 2025 | 01:03 PM
नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? चार्जरनंतर आता बॉक्समधून गायब होणार ही एक्सेसरी, 'या' कंपनीने सुरु केला धक्कादायक ट्रेंड

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? चार्जरनंतर आता बॉक्समधून गायब होणार ही एक्सेसरी, 'या' कंपनीने सुरु केला धक्कादायक ट्रेंड

Follow Us
Close
Follow Us:
  • चार्जरनंतर आता बॉक्समधून ही एक्सेसरी गायब
  • स्मार्टफोन ग्राहकांसाठी मोठा झटका
  • टेक कंपनी सोनीने केली सुरुवात
गेल्या काही वर्षांपासून नवीन स्मार्टफोनसह बॉक्समध्ये चार्जर मिळणं बंद झालं आहे. स्मार्टफोनमध्ये चार्जर मिळणं बंद झाल्यानंतर युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. चार्जरनंतर आता USB केबलची वेळ आली आहे. मोबाईल फोन तयार करणाऱ्या कंपन्यांनी आता नव्या स्मार्टफोनसोबत USB केबल देणं बंद केलं आहे. वाढता ई-कचरा आणि खर्च कमी ठेवणे, ही कंपन्यांच्या निर्णयांची प्रमुख कारणं आहेत. याचा अर्थ असा आहे की, आता ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना बॉक्समध्ये USB केबल दिली जाणार नाही. त्यामुळे त्यांना USB केबलसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकांना चांगल्या दर्जाची केबल खरेदी करावी लागणार आहे, ज्यामुळे त्यांना दिर्घकाळापर्यंत त्याचा वापर करता येणार आहे.

Tim Cook लवकरच Apple ला बोलणार गुडबाय? आता कोणाच्या हाती येणार कंपनीची सूत्र, ‘या’ नावाची जोरदार चर्चा

या कंपनीने केली नव्या ट्रेंडची सुरुवात

नव्या स्मार्टफोनच्या बॉक्समधून USB केबल हटवण्याची सुरुवात टेक कंपनी सोनी ने केली आहे. कंपनीने त्यांच्या नवीन स्मार्टफोन Sony Xperia 10 VII सह बॉक्समध्ये चार्जिंग केबल दिली नाही. म्हणजेच या स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये ना चार्जर आहे, आणि ना USB केबल. त्यामुळे ग्राहकांना USB केबल आणि चार्जर खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. खरं तर स्मार्टफोन जगात सोनी फारसं मोठं नाव नसलं तरी देखील कंपनीने आता या ट्रेंडची सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच इतर टेक कंपन्या देखील हे पाऊल उचलू शकतात. सोनीप्रमाणे, अ‍ॅपलनेही त्यांच्या नवीन एअरपॉड्सना केबल देणे बंद केले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

विवो, ओप्पो, रेडमी, रिअलमी, वनप्लस या जगभरातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक आहेत. त्यांची युजर्सची संख्या देखील प्रचंड आहे. त्यामुळे जर या कंपन्यांनी हा निर्णय घेतला आणि स्मार्टफोन बॉक्समध्ये चार्जर आणि USB केबल देणं बंद केलं तर मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. कारण युजर्सना स्मार्टफोन खरेदी करताना चार्जर आणि USB केबलसाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू शकतात. मात्र अद्याप या स्मार्टफोन कंपन्यांनी अशी कोणतीही घोषणा केली नाही.

बॉक्समध्ये चार्जर न देण्याचं कारण काय?

काही स्मार्टफोन कंपन्यांनी बॉक्समध्ये चार्जर आणि USB केबल देणं बंद केलं आहे. पर्यावरणाचं होणारं नुकसान हे यामागील कारण असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर अनेक ग्राहकांकडे एकापेक्षा अधिक USB-C केबल असतात. अशा परिस्थितीत त्यांना नवीन केबलची गरज नसते. अशा प्रकारे एक्स्ट्रा केबलने ई-वेस्ट वाढण्याचा धोका कमी होतो. चार्जर आणि केबल नसल्यामुळे फोनचे बॉक्स देखील छोटे असतील आणि यामुळे एकाच वेळी जास्त बॉक्स ट्रांसपोर्ट केले जाऊ शकतात, ज्यामुळे वाहतुकीदरम्यान होणारे प्रदूषण कमी होते.

तसेच दुसरं कारण खर्चाशी संंबंधित आहे. USB केबल न दिल्याने कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो. चार्जर आणि USB केबल देणं बंद केल्यास कंपन्यांचा खर्च देखील कमी होणार आहे. तसेच, ग्राहक दीर्घकालीन वापरासाठी स्वतंत्रपणे मूळ केबल्स खरेदी करतील, त्यामुळे कंपन्यांचा अधिक फायदा होऊ शकतो.

Web Title: Smartphone companies are planning to remove charging cable from mobile box tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Chrome यूजर्स सावधान! सरकारी एजेंसीने दिला इशारा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी लगेचच करा ‘हे’ काम
1

Chrome यूजर्स सावधान! सरकारी एजेंसीने दिला इशारा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी लगेचच करा ‘हे’ काम

Free Fire Max: गेममध्ये आणखी एका नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार गोल्ड कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी
2

Free Fire Max: गेममध्ये आणखी एका नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार गोल्ड कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी

Tech Tips: स्मार्ट ग्लास खरेदी करण्याचा प्लॅन करताय का? खरेदीपूर्वी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
3

Tech Tips: स्मार्ट ग्लास खरेदी करण्याचा प्लॅन करताय का? खरेदीपूर्वी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

Instagram Update: नव्या क्रिएटर्सच्या अडचणी वाढणार! इंस्टाग्राम पोस्ट आणि रील्सवरील हॅशटॅग्सवर येणार मर्यादा, जाणून घ्या
4

Instagram Update: नव्या क्रिएटर्सच्या अडचणी वाढणार! इंस्टाग्राम पोस्ट आणि रील्सवरील हॅशटॅग्सवर येणार मर्यादा, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.