Tim Cook लवकरच Apple ला बोलणार गुडबाय? आता कोणाच्या हाती येणार कंपनीची सूत्र, 'या' नावाची जोरदार चर्चा
टेक जायंट कंपनी Apple चा आतापर्यंतचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. कारण कंपनी त्यांच्या प्रोडक्ट्सद्वारे युजर्सच्या मनावर राज्य करत आहे. कंपनीच्या या प्रवासात Apple चे सीईओ टिम कुक यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. टिम कूक गेल्या 24 वर्षांपासून कंपनीसोबत काम करत आहेत. खरं तर टिम कूक आणि Apple असं एक समीकरण तयार झालं आहे. कोणतंही नवीन प्रोडक्ट लाँच होताना युजर्सची नजर सर्वात आधी टिम कूकला शोधते. मात्र आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता टिम कूक लवकरच त्यांचं पद सोडण्याची शक्यता आहे.
Grokipedia 1.0 लाँचसाठी तयार! एलन मस्कचं नवं मिशन, वाढवणार Wikipedia ची डोकेदुखी!
Apple चे सीईओ टिम कुक पुढील महिन्यात म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी 65 वर्षांचे होणार आहेत. खरं तर March 1998 यांनी Apple कंपनीत पदापर्ण केलं होतं. त्यावेळी त्यांना वर्ल्डवाइड ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष हे पद सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर
ऑगस्ट 2011 मध्ये जेव्हा स्टीव्ह जॉब्स यांनी राजीनामा दिला, तेव्हा टिम कूक यांची अॅपलची सीईओ पदी निवड करण्यात आली. मात्र आता टिम लवकरच त्यांचं पद सोडणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता Apple चे नवीन सीईओ कोण असणार, अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. Apple च्या सिईओ पदासाठी आता John Ternus या नावाची चर्चा सुरु झाली आहे. John Ternus हा टिम कूकचा उत्तराधिकारी आहे. याबाबत मार्क गुरमॅन यांनी सांगितलं आहे की, John Ternus ला Apple चा नवा सिईओ बनवलं जाऊ शकतं. John Ternus सध्या कंपनीत हार्डवेअर इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष आहेत आणि गेल्या 24 वर्षांपासून अॅपलमध्ये काम करत आहेत.
Ternus कंपनीच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभागी राहिला आहे. तसेच त्याचे वय देखील सिईओ पदासाठी योग्य आहे. जर सर्व योग्य ठरले तर 50 वर्षीय Ternus पुढील दशकासाठी कंपनीचे नेतृत्व करू शकतात. हा देखील एक योगायोग मानला जात आहे की, जेव्हा टिम कूकने सिईओ पदाची धुरा हाती घेतली होती, तेव्हा त्यांचं वय देखील 50 वर्षे होतं. गुरमॅन यांचं म्हणणं आहे की, Apple चे इतर वरिष्ठ अधिकारी एकतर खूपच तरुण आहेत किंवा त्यांचे निवृत्तीचे वय जवळ आले आहेत, ज्यामुळे Ternus संभाव्य उत्तराधिकारी म्हणून आघाडीवर आहे.
9 सप्टेंबर रोजी आयफोन 17 सिरीज लाँच करण्यात आली होती. तेव्हा Ternus ने आयफोन एअर सादर केला होता. एवढेच नाही तर आयफोन 17 सिरीजच्या लाँचिंगच्या वेळी तो लंडनमधील रीजेंट स्ट्रीट स्टोअरमध्ये उपस्थित होता आणि आयफोन खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनाही भेटला. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिम कूकने त्यांचं पद सोडण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
टिम कूक यांचा वाढदिवस कधी आहे?
1 नोव्हेंबर
टिम कूक यांची Apple च्या सिईओपदी कधी निवड करण्यात आली?
ऑगस्ट 2011
John Ternus कोण आहे?
Apple कंपनीत हार्डवेअर इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष