Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Tips: पावसाळ्यात कशी घ्याल स्मार्टफोनची काळजी? तुमची एक छोटी चूक आणि होईल मोठं नुकसान

Smartphone Tips for Monsoon: पावसाळ्यात स्मार्टफोनची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. कारण तुमचा थोडा निष्काळजीपणा देखील मोठं नुकसान करू शकतो. पावसाळ्यात घराबाहेर पडल्यानंतर स्मार्टफोनची काळजी कशी घ्यावी, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. एक छोटी चूकही फोनसाठी मोठं नुकसान ठरू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 24, 2026 | 11:14 AM
Smartphone Tips: पावसाळ्यात कशी घ्याल स्मार्टफोनची काळजी? तुमची एक छोटी चूक आणि होईल मोठं नुकसान

Smartphone Tips: पावसाळ्यात कशी घ्याल स्मार्टफोनची काळजी? तुमची एक छोटी चूक आणि होईल मोठं नुकसान

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ केस किंवा जिपलॉक बॅगचा वापर फायदेशीर ठरू शकतो.
  • फोनला IP रेटिंग असलं तरीही पावसात तो विनासुरक्षा वापरणं धोकादायक ठरू शकतं.
  • फोन ओला झाल्यास लगेच पुसून घ्या आणि तो पूर्ण कोरडा होईपर्यंत चार्जिंग किंवा वापर टाळा.
Smartphone Tips For Rainy Season: गेल्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आता मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात अनेक भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच वाहतुकीवर देखील परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळ्याच्या दिवसात आपला स्मार्टफोन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. कारण ट्रेन चालू आहेत की बंद, कोणत्या मार्गावर ट्रॅफिक आहे, कुठे पाऊस आहे, हे सर्व अपडेट्स आपल्याला स्मार्टफोनमधून मिळतात. पण तुमचा मोबाईल भिजला आणि बंद झाला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागू शकतं. यामुळे पावसाळ्यात आपल्या स्मार्टफोनची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असतं.

तब्बल 11,000mAh बॅटरी अन् 10,000 निट्स ब्राईटनेस…. नव्या Honor स्मार्टफोनने सर्वांनाच फोडला घाम! लाँच होताच चर्चा रंगली

वॉटरप्रूफ केसचा वापर करा

स्मार्टफोन पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही वॉटरप्रूफ केसचा वापर करू शकता. तुम्ही पावसाळ्यात कुठे बाहेर जात असाल तर अशा परिस्थितीत तुमचा फोन वॉटरप्रूफ केसमध्ये ठेवल्यास तो सुरक्षित राहू शकतो. स्मार्टफोन वॉटरप्रुफ केसमध्ये ठेवल्यानंतर तो बॅगमध्ये ठेवा, ज्यामुळे फोनला अधिक जास्त सुरक्षा मिळेल.(फोटो सौजन्य – Pinterest) 

जिपलॉक बॅगचा वापर करा

बाजारात सध्या विविध जिपलॉक बॅग्स उपलब्ध असतात, ज्यांच्या मदतीने स्मार्टफोन पाण्यापासून सुरक्षित ठेवला जाऊ शकतो. पावसाळ्यात तुम्ही अशा बॅग्जचा वापर करून तुमचा फोन पाण्यापासून सुरक्षित ठेऊ शकता. जिपलॉक बॅगचा वापर तुम्ही तुमचे ईअरबड्स आणि दुसरे गॅझेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी देखील करू शकता.

गरज नसल्यास घराबाहेर पडू नका

पावसाळ्यात सरकार नेहमी गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना देतात. जर खूप महत्त्वाचे काम असेल आणि घराबाहेर जाण्याची गरज पडत असेल तर अशावेळी स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही जिपलॉक बॅग किंवा वॉटरप्रूफ केसचा वापर करू शकता.

IP रेटिंगवर विश्वास ठेऊ नका

सध्या टेक कंपनी प्रगत तंत्रज्ञानासह नवीन स्मार्टफोन लाँच करण्यावर भर देत असतात. या स्मार्टफोनबाबत असा दावा केला जातो की, यांना पाण्यापासून कोणतेही नुकसान होत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणत्याही सुरक्षेशिवाय पावसात तुमचा स्मार्टफोन भिजवू शकता. यामुळे फोनच्या बॅटरी आणि इतर भागांवर परिणाम होऊ शकतो आणि स्मार्टफोन खराब होऊ शकतो.

Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर… असं वापरा नवं फीचर

नेहमी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स

तसेच, स्मार्टफोन ओल्या पृष्ठभागांवर ठेऊ नका. असे केल्यास फोन खराब होऊ शकतो. स्मार्टफोन पावसात ओला झाला असेल तर एका सुक्या कपड्याने तो स्वच्छ पुसून घ्या. ओल्या स्मार्टफोनचा वापर करू नका. तसेच त्याला चार्ज देखील करू नका, यामुळे ब्लास्ट होण्याचा धोका असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरज असेल तरच पावसाळ्यात बाहेर पडल्यानंतर फोनचा वापर करा. गेमिंग किंवा विनाकारण स्मार्टफोनचा वापर करणं टाळा.

Web Title: Smartphone tips for monsoon how to take care of smartphone in rainy season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
4

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.