ॲप डिलीट केल्यानंतरही तुमचे डिटेल्स राहतात सेव्ह, सुरक्षेसाठी आताच फोनेमध्ये करा ही सेटिंग्ज
तुम्ही तुमच्या स्मार्टफोन्सशिवाय एक दिवस तरी राहू शकता का? आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातात सतत स्मार्टफोन पाहिजे असतो. स्मार्टफोनशिवाय आपली काम देखील होत नाही आणि आपला टाईमपास सुद्धा होत नाही. स्मार्टफोन जितका कामाचा आहे, तितकेच त्याचे तोटे देखील आहेत. आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक ॲप्सचा वापर करतो. सोशल मीडिया ॲप्स, गेमिंग ॲप्स, असाईंमेंट किंवा आपले प्रेझेंटेशन पूर्ण करण्यासाठी Word, Excel सारखे काही ॲप्स, तर कधी जेवण ऑर्डर करण्यासाठी लागणारे काही ॲप्स. पण यातील काही ॲप्स आपल्याला आपल्या रोजच्या वापरासाठी उपयोगी पडत नाही, त्यामुळे अशा वेळी आपण असे ॲप्स आपल्या फोनमधून डिलीट करतो.
हेदेखील वाचा- सर्वसामान्यांसाठी सुरु झाला Amazon आणि Flipkart सेल! डिस्काऊंट आणि ऑफर्ससह खरेदीची संधी चुकवू नका
आपण ॲप डिलीट केलं म्हणजे त्या ॲपमधून आपली सर्व माहिती डिलीट झाली असं आपल्याला वाटतं. पण खरं तर असं नसतं. आपण जरी ॲप डिलीट केला तरी त्या ॲपमध्ये आपली सर्व माहिती सेव्ह राहते. समजा, आपण एखादे ॲप आपल्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल केलं आणि आपण काम झाल्यानंतर ते ॲप आपल्या फोनमधून डिलीट करतो. मात्र ॲप डिलीट केल्यानंतर देखील आपली सर्व माहिती त्यामध्ये सेव्ह असते. (फोटो सौजन्य – pinterest)
ऑनलाइन खरेदीपासून ते अन्न ऑर्डर करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी, आपण पटकन फोन उचलतो आणि ऑर्डर देतो. यासाठी आपल्याला ॲप उघडावे लागेल. जे ॲप्स आपण वापरतो ते आपली वैयक्तिक माहिती देखील साठवून ठेवतात, जी आपण त्यांना प्रथमच लॉग इन करताना दिली आहे. असे काही ॲप्स आहेत जे डेटा डिलीट केल्यानंतरही माहिती सेव्ह करतात. पण यामुळे तुमच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
हेदेखील वाचा- Happy Birthday Google! एक चूक आणि मिळालं नाव, जाणून घ्या Google चा 26 वर्षांचा प्रवास
जेव्हा आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये एखादे ॲप डाऊनलोड किंवा इंस्टॉल करतो, तेव्हा संबधित ॲप तुमच्याकडून लोकेशन, सोशल मीडिया फाइल्समध्ये प्रवेश करण्याची परवानगी, कागदपत्रे इत्यादी अनेक गोष्टींचा प्रवेश मिळतो. जेव्हा काही काळाने आपण हे ॲप डिलीट किंवा अनइंस्टॉल करतो, तेव्हा देखील आपण त्या ॲपना आपल्या फोनमधील लोकेशन आणि सोशल मीडिया फाइल्सचा दिलेला ॲक्सेस कायम राहतो. अशा परिस्थितीत तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते. तुम्ही काही सोप्या पद्धतीने कोणत्या ॲप्समध्ये तुमची माहिती सेव्ह आहे, हे तपासू शकता.