JioMart ची खास ऑफर, iPhone 16 खरेदी करण्याची उत्तम संधी! आतापर्यंतचा सर्वात मोठं डिस्काऊंट
iPhone नेहमी ट्रेंडमध्ये असतो. सध्या Apple आयफोन 17 ची चर्चा सुरु आहे. लवकरच आयफोन 17 आणि एक स्वस्त आयफोन लाँच केला जाणार आहे. कंपनीने अलीकडेच iPhone 16 सीरीज लाँच केली होती. कंपनीचा हा iPhone 16 फोन 79,900 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. मात्र आता या आयफोनवर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही आयफोन 16 अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता. ही ऑफर Jiomart वर उपलब्ध आहे. तुम्हाला Jiomart वर iPhone 16 अगदी कमी किमतीत खरेदी करता येईल.
Airtel, Jio की Vi कोणत्या कंपनीचे नवीन रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त? जाणून घ्या सविस्तर
इतक्या कमी किमतीत फोन विकण्याची ही पहिलीच वेळ आहे. बहुतेक लोक Amazon आणि Flipkart वर iPhone 16 ची किंमत कमी होण्याची वाट पाहत असतात. अनेकदा Amazon आणि Flipkart वर सुरु होणाऱ्या सेलमध्ये आयफोन 16 कमी किंमतीत ऑफर केला जातो. लाखो लोकं सेलमधून हा आयफोन खरेदी देखील करतात. पण आपल्याला यासाठी सेलची बरीच वाट पाहावी लागते. पण ही लोकं JioMart कडे लक्ष देत नाहीत. तुम्हाला माहित आहे का, तुम्ही आयफोन 16 जिओमार्टवरून अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता. तुम्ही JioMart वर जवळपास 27 हजार रुपयांच्या डिस्काउंटवर फोन खरेदी करू शकता. चला तर मग जिओमार्टवरील ऑफर्स आणि डिस्काऊंटबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 16 खरेदी करण्यासाठी तुम्ही Jiomart च्या वेबसाइट किंवा ॲपवर जाऊ शकता. तुम्ही येथे 79,900 रुपयांना लाँच करण्यात आलेला आयफोन 16 केवळ 69,790 रुपयांना खरेदी करू शकता. JioMart आयफोन 16 च्या खरेदीवर 12 टक्के सूट देत आहे. याशिवाय इतरही अनेक ऑफर्स आहेत, ज्यामुळे किंमत आणखी कमी केली जाऊ शकते.
आयफोन 16 वर बँक ऑफर देखील आहे, जी किंमत कमी करेल. जर तुमच्याकडे RBL बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला आयफोन 16 च्या खरेदीवर 3000 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच फोनची किंमत 66,790 रुपये होणार आहे. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.
JioMart वर iPhone 16 साठी 20 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तुम्ही आयफोन 16 खरेदी करताना iPhone 12 एक्सचेंजसाठी ठेवला तर तुम्हाला 14,150 रुपयांची सूट मिळणार आहे. म्हणजे, जर तुम्ही आयफोन 16 खरेदी करताना iPhone 12 एक्सचेंज केला तर तुम्हाला फक्त 52,640 रुपयांमध्ये iPhone 16 मिळेल.
Aadhaar-Ration Link: घरबसल्या रेशनकार्डशी आधार करा लिंक, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
iPhone 16 हा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच लाँच करण्यात आला आहे. ॲपलचा हा नवीनतम स्मार्टफोन आहे. कंपनीने फोनचे पूर्वीचे डिझाइन बदलले आहे. कॅमेरा मॉड्यूल पूर्णपणे वेगळे असेल. याशिवाय नवीन रंगही उपलब्ध आहेत. याशिवाय फोनमध्ये 6.1 इंच डिस्प्ले, 48MP फ्यूजन कॅमेरा, 12MP फ्रंट कॅमेरा आणि A18 चिप देण्यात आली आहे.