बनावट सिम वापर असाल तर आत्ताच व्हा सावध! तुमची एक चूक दाखवेल तुरूंगाचा रस्ता
आपल्या देशात सायबर घोटाळ्यांशी संबंधित दररोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. स्कॅमर्स सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्गांचा वाापर करत आहेत. ज्या लोकांना सायबर स्कॅमर्सच्या या नवीन पद्धतींबद्दल माहिती नाही, अशी लोक त्यांच्या जाळ्यात अडकतात. दिवसेंदवस वाढत असलेल्या या सायबर घोटाळ्यांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे फार मोठे आव्हान आहे.
Tech Tips: तुम्हीही लग्नात गेल्यानंतर मोबाईल फोटोग्राफी करताय? फोनचा कॅमेरा होऊ शकतो खराब
सरकार देखील या सायबर स्कॅमर्स विरोधात कठोर पावलं उचलत आहेत. या घोटाळ्यांपासून सावध राहण्यासाठी सामान्य माणसांना देखील सतर्क केलं जात आहे. आता दूरसंचार विभाग आणि सरकारने सायबर घोटाळ्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी एक कठोर निर्णय घेतला आहे. सायबर फसवणुकीविरोधातील नवीन कायदे देशात लागू होणार आहेत. जर कोणी बनावट सिमकार्ड वापरून फसवणूक केली तर त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाणार आहे आणि तीन वर्षांपर्यंत त्याला सिमकार्ड मिळणार नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
कोट्यवधी मोबाइल वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी, दूरसंचार विभागाने (DoT) सिम कार्डच्या गैरवापरामुळे होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. या उपक्रमांतर्गत, एक मोठी यादी तयार केली जात आहे ज्यामध्ये सिमकार्डचा गैरवापर करणाऱ्यांची नावे असतील.
बनावट कॉल आणि एसएमएसपासून सर्वसामान्यांना सुरक्षित ठेवणे हे दूरसंचार विभागाचे उद्दिष्ट आहे. आता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर कोणी बनावट सिमद्वारे लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या आयडीवर संशयास्पद क्रियाकलाप आढळला तर त्याला काळ्या यादीत टाकले जाईल. एकदा काळ्या यादीत टाकल्यानंतर संबंधित व्यक्ति देशात कुठूनही नवीन सिमकार्ड खरेदी करू शकणार नाही.
जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या आयडीवर सिम कार्ड खरेदी केले तर ते देखील नवीन नियमांनुसार बेकायदेशीर असेल. अशा परिस्थितीत फसवणूक करणाऱ्यांना तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. रिपोर्टनुसार, जर एखाद्या यूजरने फेक मेसेज किंवा कॉल्स पाठवले तर त्यालाही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ज्या व्यक्तीच्या सिमवर चुकीची ॲक्टिव्हिटी असेल त्या व्यक्तिवर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. त्याला आधी कळवले जाईल आणि 7 दिवसांत उत्तर मागवले जाईल.
Google Map Update: प्रवास करताना टोलचे पैसे वाचवायचे? गुगल मॅपची ही ट्रीक करणार मदत
नवीन नियम लागू झाल्यानंतर डेटाबेस तयार केला जाईल. ज्यामध्ये त्या सर्व लोकांची नावे असतील. जे बनावट सिम वापरत आहेत किंवा त्यांच्या आयडीवर कोणतीही चुकीची कामे होत आहेत. हा डाटाबेस टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत शेअर केला जाईल असेही सांगण्यात आले आहे. असे केल्याने दूरसंचार विभाग आणि कंपन्यांना बनावट सिमकार्ड वापरकर्त्यांना पकडण्यासाठी मदत होईल. सिमकार्डचा गैरवापर करणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जाईल. सिमकार्डचा गैरवापर करणाऱ्यांची नावे काळ्या यादीत टाकण्यात येणार आहेत. त्यांना 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत कोणतेही नवीन सिमकार्ड मिळणार नाही.






