२ डिसेंबरला मतदान पार पडणार; मतदारयाद्या तपासणी सुरू (संग्रहित फोटो)
गोंदिया : यंदा प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला आहे. 2 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांना आता प्रचारासाठी केवळ सहा दिवसच शिल्लक राहिले आहेत. सहा दिवसांत संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी धावाधाव करत आहेत. काहींनी मतदारांशी थेट संपर्क ठेवण्यासाठी माणसंही नेमली गेली आहेत. वरिष्ठ नेत्यांची प्रभागात सभा आयोजित करता येतील याचे नियोजन केले जात आहे. कार्यकर्त्यांकडून मतदार याद्या तपासणी सुरू करण्यात आली आहे.
नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा फिव्हर चांगलाच वाढला आहे. आता प्रचारासाठी केवळ सहा दिवस राहिले असल्याने उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. कॉर्नर सभा, पदयादात्रा काढत ‘होम टू होम’ प्रचार करण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. प्रचारादरम्यान उमेदवाराकडून पाठीशी राहा, असे आवाहन केले जात आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी असणाऱ्या मतदारांशी संपर्क केला जात आहे. ‘भाऊ तेवढं लक्ष असू द्या, यंदा आपली उमेदवारी आहे,’ असे म्हणत मतदारांना साद घातली जात आहे.
हेदेखील वाचा : Kolhapur local elections: कोल्हापूर स्थानिक निवडणुका: नगरपालिका निवडणुकीत घराणेशाही व गटबाजीचा प्रभाव वाढला
अनेकजण तर मतदारांच्या पाया पडून आशीर्वाद देण्याची मागणी केली जात आहे, तर कार्यकर्त्यांकडूनही तूफान आलंया म्हणत आमच्या भाऊलाच पाठीशी राहण्याचे आवाहन केले जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील दोन पालिका आणि दोन नगर पंचायत निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकांमुळे आरोप-प्रत्यारोपाने राजकीय वातारण ढवळून निघाले आहे. यंदा बऱ्याच कालावधीनंतर निवडणुका होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडणुकीच्या रिंगणात अपक्षांनी उडी घेत खरी रंगत आणली आहे. मात्र, त्यांना अद्याप निवडणूक चिन्हच नसल्याने प्रचारात गोची होत आहे. सर्वच ठिकाणी सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांत सामना रंगला आहे. तर काही ठिकणी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप व शिंदेसेनेत कुस्ती होत आहे.
पंगती तर कुठे लक्ष्मीदर्शन
उत्साही यंदा नगरसेवक होण्याचा चंग बांधलेल्या कार्यकर्त्यांकडून जेवणावळीच्या पंगती उठविल्या जात आहे. तर काही ठिकाणी लक्ष्मी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असली तरी अद्याप लक्ष्मीदर्शन सुरू केले नाही. प्रचाराच्या शेवटच्या क्षणी याचा वापर केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : महायुती 2 तारखेपर्यंत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने उडणार राजकीय भडका?






