Tech Tips: तुम्हीही लग्नात गेल्यानंतर मोबाईल फोटोग्राफी करताय? फोनचा कॅमेरा होऊ शकतो खराब
सध्या लग्नसराई सुरु आहे. लग्न, हळद, साखरफुडा या सर्व सोहळ्यांना आपण जातो. विशेषत: एखाद्या विवाह सोहळ्याला गेल्यानंतर आपलं सर्वात पहिलं कामं असतं फोटो काढणं. विवाह सोहळ्यात आपल्याला क्विचीचत अशी एखादी व्यक्ति पाहायला मिळेल, जिला फोटो काढण्यात काही इंटरेस्ट नाही. विवाह सोहळ्यात प्रोफेशनल फोटोग्राफर सोबतच मोबाईलने फोटो काढणारे लोकं देखील असतात. विवाह सोहळ्याला येणारे लोकं मोठ्या प्रमाणावर फोटो काढत असतात. कधी नवरा नवरीचे फोटो काढले जातात, तर कधी नातेवाईकांचे.
Google Map Update: प्रवास करताना टोलचे पैसे वाचवायचे? गुगल मॅपची ही ट्रीक करणार मदत
आपल्याला लग्नातील प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याची इच्छा असते. कारण अशा खास क्षणांच्या आठवणी साठवून ठेवायला प्रत्येक व्यक्तिला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का, विवाह सोहळ्यात केल्या जाणाऱ्या फोटोग्राफीमुळे तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो. या फोटोग्राफीमुळे तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे नुकसान होऊ शकतं. लग्नसमारंभात फोटोग्राफी करणं तर खूप नॉर्मल गोष्ट आहे, मग यामुळे स्मार्टफोनचा कॅमेरा कसा खराब होऊ शकतो? (फोटो सौजन्य – pinterest)
आता लग्नसमारंभात वापरण्यात येणारे दिवे आणि सजावटीची पद्धत बदलली आहे. लग्नसमारंभात अनेकदा तेजस्वी दिवे, विशेषत: फ्लॅश किंवा लेझर लाईट लावल्या जातात. या लाईटचा परिणाम आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर होतो, ज्यामुळे आपल्या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्याचा सेंसर खराब होऊ शकतो.
सततच्या पडणाऱ्या फ्लॅश किंवा लेझर लाईटमुळे आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर परिणाम होतो. याचा अर्थ असा नाही की आपण लग्नसमारंभात फोटोग्राफी करू नये. पण लग्नसमारंभात फोटोग्राफी करताना आपण काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्या स्मार्टफोनचा कॅमेरा खराब झाल्यास आपल्याला नवीन फोन खरेदी करण्याची गरज भासू शकते.
लग्नसमारंभात स्मार्टफोनची सर्वात मोठी समस्या लेझर लाईटच्या वापरामुळे येते. लेझर लाइट थेट कॅमेरा लेन्सच्या संपर्कात आल्यास आगीच्या घटना घडू शकतात. ज्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शतते.
लेझर लाईटमुळे तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा खराब होत आहे की नाही हे ओळखण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुमच्या फोनवरून क्लिक करण्यात आलेल्या प्रत्येक फोटोमध्ये हिरवे, नारंगी किंवा पांढरे ठिपके किंवा रेषा दिसू लागतात.
कॅमेरा थेट प्रकाशाकडे वळवल्यास, कॅमेराची ऑटो-फोकस सिस्टम विस्कळीत होते आणि कधीकधी अस्पष्ट फोटो दिसू लागतात. ऑटो-फोकस एडजस्ट करण्यासाठी अधिक वेळ लागतो.
Realme Neo 7 चे Bad Guys लिमिटेड एडिशन या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स
तेजस्वी प्रकाशाच्या एक्सपोजरमुळे, फोटोंचे कॉन्ट्रास्ट आणि सॅचुरेशन विस्कळीत होते आणि तुमच्या फोनवरून क्लिक केलेला प्रत्येक फोटो निस्तेज दिसू लागतो.
प्रखर प्रकाशात वारंवार फोटो क्लिक करणे किंवा व्हिडिओग्राफी केल्याने कॅमेरा सेन्सरची सेंसिटिविटी बिघडू शकते. असे झाल्यानंतर, फोनचा लो-लाइट फोटोग्राफी परफॉर्मन्स बिघडू लागतो.
लग्नसमारंभात फोटोग्राफी किंवा व्हिडीओग्राफी करताना तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा खराब होऊ नये यासाठी कॅमेरा लेन्स किंवा प्रकाश कमी करणारे फिल्टर वापरा. याशिवाय स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे मजबूत लेझर लाइटपासून संरक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी लेझर लाईट असेल त्या ठिकाणी फोटोग्राफी किंवा व्हिडीओग्राफी करण्याची चूक करू नका, कारण यामुळे तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याच्या सेंसरला नुकसान होऊ शकते.