युजर्सचे दुर्दैव की कंपनीचे चातुर्य? लाखो रुपये खर्च करूनही S पेनमध्ये नाही मिळणार Galaxy 25 Ultra ब्लूटूथ
अलीकडेच स्मार्टफोन कंपनी Samsung ने त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या मोठ्या ईव्हेंटमध्ये Galaxy S25 सिरीज लाँच करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये Galaxy S25 Ultra हा नवीनतम स्मार्टफोन 1,29,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे इतर कंपन्यांची झोप उडाली आहे. मात्र या स्मार्टफोनबाबत एक तक्रार केली जात आहे. ही तक्रार म्हणजे Galaxy 25 Ultra च्या S पेनमधून ब्लूटूथचं ऑप्शन काढून टाकण्यात आलं आहे.
खरं तर स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच अशी चर्चा सुरु होती, ज्यामध्ये सांगितलं जात होत की, Galaxy 25 Ultra च्या S पेनमधून ब्लूटूथचं ऑप्शन काढून टाकलं जाणार आहे. मात्र कंपनीने याबद्दल कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. मात्र आता या स्मार्टफोनच्या S पेनमधून ब्लूटूथचं ऑप्शन काढून टाकण्यात आलं आहे. म्हणजेच अगदी लाखो रुपये खर्च करून देखील युजर्सना या स्मार्टफोनच्या S पेनमध्ये ब्लूटूथ ऑप्शन मिळालं नाही. पण आता अशी एक बातमी समोर आली आहे की, युजर्सना Galaxy 25 Ultra च्या S पेनमध्ये ब्लूटूथ ऑप्शनची आवश्यकता असेल तर त्यांना नवीन पेन खरेदी करावं लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युजर्स 50 डॉलर्सना ब्लूटूथ असलेला S पेन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
सॅमसंग त्याच्या फ्लॅगशिप सीरिजच्या बिग बॉस गॅलेक्सी 25 अल्ट्रामध्ये काहीतरी करेल, अशी सर्वांनाच कल्पना होती. गेल्या वर्षी S24 Ultra मध्ये असेच काहीसे घडले होते. कंपनीने एआय फीचर्सची घोषणा केली पण नंतर कळले की ही सेवा मोफत नाही. त्याची किंमत मोजावी लागेल. आता देखील कंपनीने असंच काही केलं आहे. ज्यामुळे युजर्स नाराज झाले आहेत.
No Bluetooth on the @SamsungMobileUS Galaxy S25 Ultra SPen… Who cares?! #GalaxyUnpacked pic.twitter.com/BheIFoDTbu
— shane starnes (@DroidModderX) January 23, 2025
सॅमसंगची अल्ट्रा सीरिज जितकी अप्रतिम कॅमेरे, उत्कृष्ट यूजर इंटरफेस, उत्तम प्रोसेसर यासाठी ओळखली जाते तितकीच त्याची एस-पेनही प्रसिद्ध आहे. कोपऱ्यात असलेला हा पेन फक्त नोट्स घेण्यासाठी नाही, तर इतर अनेक कामांसाठी फायद्याचा आहे. त्याच्या मदतीने फोन दूर ठेवून फोटो आणि व्हिडिओ काढता येतात. समोरच्या शूटरवरून बॅक शूटरवर स्विच करू शकतो. हे एक प्रकारचे रिमोट समजा कारण ते ब्लूटूथ कनेक्ट केलेले डिव्हाइस आहे. पेनची क्रेझ फोनपेक्षा कमी नाही. पण आता असे होणार नाही. कारण कंपनीने Galaxy 25 Ultra मध्ये हे फक्त एक पेन बनवले आहे. कारण Galaxy 25 Ultra च्या पेनमध्ये ब्लूटूथ नाही.
Galaxy 25 Ultra मधील पेन नोट्स घेण्यासाठी किंवा स्क्रीनवर चित्र काढण्यासाठी उपयुक्त ठरेल. गेल्या आठवड्यात जेव्हा फोन लाँच झाला तेव्हा लोकांना वाटले की कदाचित काही सॉफ्टवेअर त्रुटी आहे. कंपनी अपडेट पाठवून त्याचे निराकरण करेल. पण आता कंपनी ब्लूटूथ सपोर्ट असलेले पेन वेगळे विकणार असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच तुम्हाला Galaxy 25 Ultra साठी ब्लूटूथ सपोर्ट असलेले पेन पाहिजे असल्यास तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहे. त्याची किंमत काय असेल, भारतात मिळेल की नाही? हे सध्या स्पष्ट नाही.