फोटो सौजन्य - pinterest
फ्री WI-FI वापरणं कोणाला नाही आवडत? आपला इंटरनेट डेटा संपवण्यापेक्षा अनेक लोकं फ्री WI-FI वापरण्याला प्राधान्य देतात. रेल्वे स्टेशन, बस स्टॉप किंवा मॉल अशा अनेक ठिकाणी सार्वजनिक WI-FI लावले जातात. आपल्याला नेटवर्क नसेल किंवा आपल्या फोनमधील रिचार्ज संपला असेल तर बऱ्याचदा आपण या WI-FI ला कनेक्ट करतो. WI-FI मुळे आपली अनेक कामं अगदी सहज होतात. इतकंच काय तर ह्या WI-FI वर आपण युट्यूब व्हिडीओ किंवा इंस्टाग्रामच्या रिल्स देखील पाहू शकतो.
हेदेखील वाचा- Jio ने 1799 च्या किंमतीत लाँच केला UPI सपोर्ट आणि मोठी स्क्रीन असलेला फोन
काही लोकं तासंतास हा फ्रीचा सार्वजनिक WI-FI आपल्या फोनला कनेक्ट करून ठेवतात. पण हा फ्रीचा सार्वजनिक WI-FI तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतो. सार्वजनिक WI-FI तुमच्या फोनला कनेक्ट केल्यास तुमचा फोन हॅक देखील होऊ शकतो. तुमच्या फोनमधील डेटा अगदी सहज हॅकर्सपर्यंत पोहोचतो. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या WI-FI वर नेहमीच हॅकर्सचे लक्ष असते. हॅकर्स सार्वजनिक WI-FI च्या मदतीने लोकांचे फोन हॅक करू शकतात. सार्वजनिक ठिकाणी WI-FI वापरणाऱ्या युजर्सना माहितीही नसते आणि हॅकर्स त्यांच्या डिव्हाइसमधून त्यांचा वैयक्तिक आणि महत्त्वाचा डेटा चोरतात.
हेदेखील वाचा- लवकरच लाँच होणार आहे Xiaomi 14 Civi Limited Edition! पांडाप्रेमींसाठी असेल खास डिझाईन
याबाबत आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लोकांना सार्वजनिक WI-FI वापरताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. मंत्रालयाच्या वतीने, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने सार्वजनिक WI-FI चा वापर करणाऱ्यांसाठी काही टीप्स शेअर केल्या आहेत. या टिप्स लक्षात ठेवून, तुम्ही स्वतःला आणि तुमचे डिव्हाइस हॅकर्सपासून सुरक्षित ठेवू शकता. याबाबत CERT-In ने एक पोस्ट केली आहे.
CERT-In ने शेअर केलेल्या टीप्स-