ओप्पो, विवो नाही ही कंपनी आहे पाकिस्तान स्मार्टफोन युजर्सची पहिली पसंती, नाव तर तुम्हीही ऐकल नसेल
भारतात सध्या अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांची सत्ता गाजवत आहेत. यामध्ये ओप्पो, विवो, वनप्लस, अॅपल, लावा, शाओमी यांसारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. यातील काही कंपन्या प्रिमियम रेंजमध्ये स्मार्टफोन लाँच करतात, तर काही कंपन्या कमी किंमतीत बजेट रेंजमध्ये त्यांचे स्मार्टफोन्स लाँच करत असतात. असे अनेक स्मार्टफोन्स आहेत, जे सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहेत. मात्र असं असलं तरी देखील भारतातील स्मार्टफोन्स युजर्सची या स्मार्टफोन कंपन्यांना पसंती आहे. याच कंपन्यांच्या स्मार्टफोन्सची भारतात सर्वाधिक मागणी आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का, पाकिस्तानातील स्मार्टफोन युजर्स कोणत्या कंपनीच्या फोनला पसंती दर्शवतात?
भारतापेक्षा पाकिस्तानातील स्मार्टफोन मार्केट पूर्णपणे वेगळं आहे. पाकिस्तानातील स्मार्टफोन मार्केटमध्ये तुम्हाला एक वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. पाकिस्तानात एक अशी कंपनी आहे, जीच्या स्मार्टफोनची विक्री सर्वाधिक होते. मात्र भारतातील 90 टक्के लोकांनी या कंपनीचे नाव यापूर्वी नक्कीच ऐकलं नसेल. आता आम्ही तुम्हाला अशाच कंपनीबद्दल सांगणार आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कंपनीने चीन आणि इतर मोठ्या ग्लोबल ब्रँड्सना देखील मागे टाकलं आहे. (फोटो सौजन्य – VGO Tel)
पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरण (PTA) ने अलीकडेच शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षभरात स्थानिक मोबाईल फोन असेंब्लीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जुलै 2025 पर्यंत शेअर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये ज्या कंपनीचे नाव सर्वोच्च स्थानावर आहे, त्या कंपनीचे नाव आहे VGO Tel. या कंपनीने जुलैमध्ये 2.12 मिलियन यूनिट्स तयार केले होते, त्यामुळे ही पाकिस्तानाची नंबर वन स्मार्टफोन असेंबली कंपनी बनली आहे.
लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर Infinix आहे. या कंपनीने 2.01 मिलियन यूनिट्स तयार केले आहे. तिसऱ्या स्थानावर Itel आहे, ज्या कंपनीने 1.53 मिलियन यूनिट्स तयार केले आहेत. 1.38 मिलियन यूनिट्ससह चौथ्या स्थानावर विवो आणि 1.04 मिलियन यूनिट्ससह पाचव्या स्थानावर Xiaomi आहे.
जगातील सर्वात मोठा ब्रँड असलेला सॅमसंग या यादीत सहाव्या स्थानावर आहे. या कंपनीने 0.93 मिलियन यूनिट्सचे उत्पादन केले होते. या यादित सातव्या स्थानावर Tecno आहे, ज्याने 0.89 मिलियन युनिट्स तयार केले आहेत. तर या यादित आठव्या स्थानावर Q Mobile आहे, ज्याने 0.72 मिलियन युनिट्स आणि नवव्या स्थानावर असलेल्या G’Five ने 0.7 मिलियन युनिट्स तयार केले होते. यादित दहाव्या स्थानावर असलेल्या Nokia ने 0.65 मिलियन युनिट्स तयार केले होते.
पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणने शेअर केलेल्या या टॉप 10 कंपन्यांच्या यादित Apple iPhone किंवा OnePlus सारख्या कंपन्यांचा समावेश नाही. यामागील कारण म्हणजे या स्मार्टफोनच्या सर्वाधिक किंमती. अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये काही आयफोन मॉडेल्सची किंमत 6 लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच आयफोन सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. प्रोपाकिस्तानी वेबसाइटनुसार, येत्या 12 महिन्यांत पाकिस्तानमध्ये मोबाईल फोनची विक्री 7-8% वाढण्याची अपेक्षा आहे.