Asia Cup 2025 (Photo Credit- X)
Asia Cup 2025 Live Streaming: आशिया कप 2025 चा (Asia Cup 2025) थरार बुधवारपासून म्हणजेच 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण कोणत्या टीव्ही चॅनेलवर होईल आणि त्याची ऑनलाइन स्ट्रीमिंग कोणत्या ॲपवर पाहता येईल, याची घोषणा झाली आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे, कारण या वर्षी आशिया कप JioCinema किंवा Hotstar वर दिसणार नाही. त्यामुळे, सामने पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे म्हणजेच त्यांना नवीन सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. चला जाणून घेऊया आशिया कप 2025 कधी, कुठे आणि कसा पाहता येईल.
आशिया कपचा पहिला सामना उद्या, 9 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळला जाणार आहे.
अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील हा सामना अबू धाबी येथील शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8.00 वाजता सुरू होईल, तर टॉस संध्याकाळी 7.30 वाजता होईल.
आशिया कप 2025 च्या प्रक्षेपणाचे हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही सोनी स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर हिंदी, इंग्लिश आणि इतर भाषांमधील कॉमेंट्रीसह सामने पाहू शकता.
या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग भारतात सोनी लिव्ह (Sony LIV) ॲपवर पाहिले जाऊ शकते. त्यामुळे, आशिया कपचे सामने पाहण्यासाठी तुमच्याकडे सोनी लिव्हचे सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्ही सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्ड्ससाठी www.navarashtra.com ला देखील भेट देऊ शकता.
हे देखील वाचा: आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’
टीम इंडिया आशिया कप 2025 मध्ये 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर त्यांचा पुढचा सामना 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होईल. हे दोन्ही सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळले जातील. त्यानंतर भारतीय संघ 19 सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध आपला पुढचा सामना खेळेल. या आशिया कपसाठी टीम इंडियाला ग्रुप-ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. दोन्ही गटातील टॉप-2 संघ सुपर-4 मध्ये स्थान मिळवतील.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग