वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
ENG vs WI, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १५ वा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत शेरफेन रदरफोर्डच्या अर्धशतकाच्या जोरावर ६ गडी गमावून १९६ धावा उभ्या केल्या आहेत. या सामन्यात शेरफेन रदरफोर्ड आणि जेसन होल्डर यांच्या समोर आदिल रशीद वगळता इंग्लंडची गोलंदाजी हतबल दिसून आली. इंग्लंडला हा सामना जिंकायचा असेल तर १९७ धावा कराव्या लागणार आहेत. इंग्लंडकडून आदिल रशीदने २ विकेट्स घेतल्या.
मुंबई येथील वानखेडे स्टेडियवर(आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६) खेळला जात असलेल्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वेस्ट इंडिज संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्री करण्यात आले. वेस्ट इंडिज संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये संघाला ब्रँडन किंगच्या रूपाने पहिला झटका बसला. तर त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये कर्णधार शाई होप भोपळा न फोडताच बाद झाला. ८ धावसंख्येवर वेस्ट इंडिजने आपले दोन्ही सलामीवीर गमावले.
त्यानंतर मात्र शिमरॉन हेटमायर आणि रोस्टन चेस दोघांनी डाव सावरला. या दोघांनी ४७ धावांची भागीदारी रचली. शिमरॉन हेटमायर २३ धावा करून बाद झाला. तर त्यानंतर रोस्टन चेस देखील ३४ धावा करून माघारी गेला. या सेट फलंदाजांच्या माघारी जाण्याने संघ अडचणीत आला. परंतु, तेव्हा शेरफेन रदरफोर्डचे वादळ मैदानावर आले त्याने शानदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्याला रोवमन पॉवेल(१४ धावा) साथ दिली. पॉवेल बाद झाल्यावर आलेल्या जेसन होल्डरने देखीळ इंग्लंडच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला.
Sherfane Rutherford’s half-century fires up the West Indies at Wankhede 👊 It is one of our @marriottbonvoy Milestones of the day. pic.twitter.com/IwMj3xQ5Y2 — ICC (@ICC) February 11, 2026
रदरफोर्ड आणि होल्डर यांनी ५३ धावांची भागीदारी रचली आणि वेस्ट इंडिज संघाला सन्मानजनक धावसंख्येकडे पोहचवले. होल्डरने १७ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३३ धावा फटकावल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर शेरफेन रदरफोर्डने अंतिम ओव्हरपर्यंत नाबाद राहून संघाला १९६ पर्यंत पोहचवले. तो ४२ चेंडूत ७६ धावांची खेळी करून नाबाद राहिला. त्याने या खेळीत २ चौकार आणि ७ षटकार मारले. तर रोमारियो शेफर्ड १ धावा काढून नाबाद राहिला. आदिल रशीद आणि जेमी ओव्हरटन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर सॅम करन आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: ब्रँडन किंग, शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकिल होसेन, गुडाकेश मोती, शमार जोसेफ
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: फिलिप साल्ट, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बॅंटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद






