मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! (Photo Credit- X)
मोनोरेलच्या संचालन आणि देखभालीसाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. पॉवर मेक प्रोजेक्ट्स या कंपनीने सर्वात कमी म्हणजे २९६ कोटी रुपयांची निविदा सादर केली असून, पुढील पाच वर्षांसाठी मोनोरेल चालवण्याचे कंत्राट या कंपनीला मिळण्याची दाट शक्यता आहे, मोनोरेल सेवा पुन्हा सुरू झाल्यास पूर्व मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
वारंवार तांत्रिक आणि अभियांत्रिकी समस्यांमुळे कामकाजात व्यत्यय आला, ज्यामुळे पुन्हा काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉपोरेशन लिमिटेडद्वारे देखरेख केली जात आहे, ज्याने नवीन रोलिंग स्टॉक पुरवठादाराला उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करण्यास सांगितले आहे.
एमएमआरडीएने गेल्या आठवड्यात आयएसए अंतर्गत सुरक्षा तपासणी सुरू केली असून ती अजून काही दिवस चालणार आहे. सर्व सुरक्षा निकष पूर्ण झाल्यानंतर मोनोरेल सुरू करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच, मोनोरेलसाठी सीएमआरएस (कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेपटी) यांची स्वतंत्र तपासणीही होणार आहे. यासाठी निवृत्त अधिका-याची इंडिपेंडंट इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली जाईल.
Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत






