Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईल यूजर्ससाठी खुशखबर! डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स आता होणार स्वस्त… काय आहे TRAI चा नवा प्लॅन? जाणून घ्या

महागड्या रिचार्ज प्लॅन्समुळे लोकं हैराण झाले आहेत. लोकांची हीच समस्या लक्षात घेऊन ट्राय एक नवीन योजना घेऊन आला आहे. ज्यामध्ये लोकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन्स ऑफर केले जाऊ शकतात. TRAI च्या नव्या प्रस्तावानुसार, लवकरच डेटाशिवाय केवळ कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देणारे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2026 | 07:00 AM
मोबाईल यूजर्ससाठी खुशखबर! डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स आता होणार स्वस्त... काय आहे TRAI चा नवा प्लॅन? जाणून घ्या

मोबाईल यूजर्ससाठी खुशखबर! डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स आता होणार स्वस्त... काय आहे TRAI चा नवा प्लॅन? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • TRAI च्या नव्या प्रस्तावामुळे लवकरच व्हॉईस-ओन्ली आणि एसएमएस-ओन्ली रिचार्ज प्लॅन्स कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकतात.
  • फीचर फोन आणि सेकंडरी सिम वापरणाऱ्या ग्राहकांना डेटाशिवाय स्वस्त रिचार्जचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे.
  • नवीन नियम लागू झाल्यास टेलिकॉम कंपन्यांना 7, 28, 56 आणि 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह व्हॉईस-ओन्ली प्लॅन्सही ऑफर करावे लागतील.
अलीकडेच अशी माहिती समोर आली होती की, पुढील 3 ते 4 महिन्यांत भारतातील टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत 12 ते 15 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या या बातमीमुळे सर्वच ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स म्हणजेच केवळ व्हॉईस कॉलिंग प्लॅन्स स्वस्त होणार असल्याचे सांगितलं जात आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAI ने हा प्रस्ताव सादर केला आहे. ज्या ग्राहकांना डेटाची आवश्यकता नसते आणि जे ग्राहक केवळ व्हॉईस कॉलिंग पॅक खरेदी करतात अशा ग्राहकांना ट्रायच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

नव्या प्रस्तावानुसार, टेलिकॉम कंपन्यांना आता केवळ कॉलिंग आणि एसएमएस ऑफर करणारे रिचार्ज प्लॅन्स देखील उपलब्ध करावे लागणार आहेत. यामुळे फीचर फोनचा वापर करणाऱ्या आणि सेकेंडरी सिम वापरणाऱ्या लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे, आणि त्यांना रिचार्ज प्लॅन खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

काय आहे ट्रायचा नवा प्लॅन?

सध्या कॉलिंग आणि एसएमएस ऑफर करणारे रिचार्ज प्लॅन लिमिटेड व्हॅलिडीटीसह ऑफर केले जातात. पण जर नवीन नियम लागू झाला तर ज्या कंपन्यांकडे 7, 28, 56 आणि 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणारे प्लॅन उपलब्ध आहेत, त्यांना याच व्हॅलिडीटीसह व्हॉईस-ओन्ली आणि एसएमएस ओन्ली प्लॅन्स देखील लाँच करावे लागणार आहेत. ट्रायच्या या निर्णयामुळे यूजर्स त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅनची निवड करू शकणार आहेत, तसेच त्यांना गरज नसताना डेटासाठी जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत.

डेटा-फ्री प्लॅन्स होणार स्वस्त

मीडिया रिपोर्टनुसार, ट्रायचं असं मत आहे की, ज्या यूजर्सना मोबाईल डेटाची गरज नाही, अशा यूजर्सना केवळ कॉलिंग आणि एसएमएससाठी वेगळा प्लॅन निवडण्याचा पर्याय मिळणं आवश्यक आहे. सध्या, लोकांना असे प्लॅन खरेदी करण्यास भाग पाडले जाते ज्यात डेटा मिळतो, परंतु त्याची खरोखर गरज नसते. हेच सर्व लक्षात घेऊन ट्रायने नवीन प्रस्ताव सादर केला आहे. ज्यामध्ये सांगितलं आहे की, टेलिकॉम कंपन्यांना डेटा प्लॅन्ससह समान व्हॅलिडीटीवाले व्हॉईस ओन्ली आणि एसएमएस ओन्ली प्लॅन्स देखील लाँच करावे लागणार आहेत.

Tech Tips: LinkedIn वर हजारो लोकांपर्यंत पोहोचायचंय? प्रोफाईलची रिच वाढवण्यासाठी फॉलो करा या स्मार्ट ट्रिक्स

किती कमी होणार रिचार्ज प्लॅन्सची किंमत?

मोबाईल रिचार्जच्या खर्चामध्ये डेटा सेवांचा मोठा वाटा असतो. एका अंदाजानुसार, कोणत्याही प्लॅनच्या किंमतीत सुमारे 50 ते 70 टक्के डेटा सेवांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे जर डेटा हटवून केवळ कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा ऑफर केली तर रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत फार मोठा फरक पडू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या डेटा प्लॅनची किंमत 300 रुपये आहे. तर त्याच व्हॅलिडिटीमध्ये केवळ कॉलिंग आणि एसएमएस असलेल्या प्लॅनची ​​किंमत सुमारे 100 ते 1150 रुपये असू शकते. तथापि, अंतिम किंमत ठरवण्याचा अधिकार दूरसंचार कंपन्यांकडेच राहील. म्हणजेच डेटा-फ्री रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत 50 टक्क्यांहून अधिक घट होऊ शकते.

Web Title: Trai proposal voice only recharge plans may get cheaper big relief for feature phone users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • recharge plans
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या
1

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स
2

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स

WhatsApp Update: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी नवं फीचर जारी! अनोळखी कॉल्सची मिळणार माहिती, अकाऊंट होणार आणखी सुरक्षित
3

WhatsApp Update: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी नवं फीचर जारी! अनोळखी कॉल्सची मिळणार माहिती, अकाऊंट होणार आणखी सुरक्षित

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला चॉकलेट्स नाही… लाडक्या बहिणीला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, पाहताच होईल खुश!
4

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला चॉकलेट्स नाही… लाडक्या बहिणीला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, पाहताच होईल खुश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.