Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला 'हा' स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत
सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन कंपनीने 6GB+128GB व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. या व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये ठेवण्यात आली होती. कंपनीने 4 जुलै रोजी या स्मार्टफोनची विक्री सुरु केली. ऑफरअंतर्गत ग्राहकांना हा स्मार्टफोन 22,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध होती. मात्र आता कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. सध्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर हा स्मार्टफोन 32,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: Samsung)
ऑफर किंमतीपेक्षा स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत आता 10 हजार रुपये आणि लाँच किंमतीपेक्षा 7 हजार रुपयांनी वाढली आहे. तर डिव्हाईसचे 8GB + 128GB व्हेरिअंट 25,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते, ते आता 36,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर 8GB+ 256GB व्हेरिअंट आता 30,999 रुपयांऐवजी 41,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरिअंटची किंमत 8,000 रुपयांनी वाढवली आहे.
गेल्या काही महिन्यांत स्मार्टफोन्सच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मेमरी चिप्सच्या वाढत्या किमतींचे कारण देत नथिंग, रिअलमी, विवो आणि शाओमी सारख्या कंपन्यांनीही त्यांच्या काही विद्यमान स्मार्टफोन्सच्या किमती वाढवल्या आहेत. मात्र, सॅमसंग गॅलेक्सी एम 47 5G च्या बाबतीत हे प्रकरण थोडे मानले जात आहे, कारण हा स्मार्टफोन 10 दिवसांआधीच लाँच करण्यात आला होता. तज्ज्ञांचं असं मत आहे की, कंपनीला लाँचवेळीच कंपोनेंट्स आणि मेमोरीच्या किंमतींचा पूर्ण अंदाज होता. स्मार्टफोनची किंमत वाढवण्याचं अधिकृत कारण अद्याप कंपनीने जाहीर केलं नाही.






