Upcoming Smartphone: पुढील आठवड्यात लाँच होणार हा जबरदस्त फोल्डेबल फोन, स्लिम प्रोफाइलसारख्या फीचर्सनी असणार सुसज्ज
Vivo X Fold 5 स्मार्टफोन पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. हा फोन 25 जून रोजी ऑफिशियली चीनमध्ये लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचे काही डिटेल्स लाँचिंगपूर्वीच समोर आले आहेत. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार याबाबत कंपनीने कोणतेही टिझर शेअर केलेला नाही. मात्र या स्मार्टफोनच्या चीनमधील लाँचिंगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या स्मार्टफोनचे प्रोडक्ट पेज Vivo च्या ऑफिशियल चाइनीज वेबसाइटवर लाईव्ह झाले आहे आणि प्री-ऑर्डर्स देखील सुरु झाले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्यावर्षी X Fold 3 सीरीज दोन मॉडेल्समध्ये लाँच करण्यात आला होता. ज्यामध्ये स्टँडर्ड आणि प्रो यांचा समावशे आहे. मात्र यातील केवळ X Fold 3 Pro भारतात लाँच करण्यात आले होते. मात्र आगामी X Fold 5 केवळ स्टँडर्ड मॉडेलमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा फोन 25 जून रोजी लाँच केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Vivo चे प्रोडक्ट मॅनेजर Han Boxiao ने Weibo वर काही डिटेल्स शेअर केले आहेत. त्यांनी कंफर्म केल आहे की, इनर आणि आउटर दोन्ही स्क्रीन्सवर 8T LTPO पॅनल्स असणार आहेत, जे 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करू शकतात. दोन्ही डिस्प्ले TV Rheinland ग्लोबल आय प्रोटेक्शन आणि Zeiss Master कलर सर्टिफिकेशनला सपोर्ट करतील अशी शक्यता आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हे त्याच्या आधीच्या मॉडेलच्या तुलनेत सर्व लाइटिंग कंडीशन्समध्ये चांगली स्पष्टता, कम्फर्ट आणि कलर एक्यूरेसी प्रदान करेल.
Vivo X Fold 5 मध्ये IP5X डस्ट प्रोटेक्शन आणि IPX9+ वॉटर रेसिस्टेंस रेटिंग असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे 1 मीटर खोल असलेल्या पाण्यात 1,000 वेळा फोल्ड आणि अनफोल्ड होऊ शकतो. आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे आगामी विवो स्मार्टफोनचे वजन आणि जाडी. मिळालेल्या माहितीनुसार, X Fold 5 त्याच्या मागील मॉडेलपेक्षा खूपच सडपातळ आणि हलका आहे, त्याचे वजन सुमारे 209 ग्रॅम आहे आणि उघडल्यावर त्याची जाडी फक्त 4.3 मिमी आहे.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Vivo X Fold 5 मध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे, जो 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह जोडलेला असणार आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम असण्याची शक्यता आहे. बॅटरी सुमारे 6,000mAh असू शकते, जी 90W फास्ट चार्जिंग आणि 30W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. Weibo वर शेअर केलेल्या टीझरनुसार, हा फोन Apple Watch शी कनेक्ट होऊ शकतो, iCloud फाइल्स थेट अॅक्सेस करू शकतो आणि MacBooks आणि AirPods सह देखील काम करू शकतो.