बीड: एका विवाहितेने आधी एका पोलीस उपनिरीक्षकावर अत्याचाराचे आरोप केले. त्यानंतर आरोपी फरार झाला पोलीस त्याच्या शोध घेत होते. दरम्यान पीडित महिला आणि आरोपी दोघे फिरत असतांना पीडितेच्या पतीने रंगेहाथ पकडले. आणि आरोपीला बेदम मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी सुमारे दोन वाजता बीड बस्थानकासमोर घडला.
Dombivli Crime : डोंबिवलीत मोबाईल पासवर्डवरून हाणामारी; लाटणं, तवा, चामडी पट्ट्याने बेदम मारहाण
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र शिंदे हे २०१३ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून बीड पोलीस दलात दाखल झाले. ते पीडितेच्या शेजारी राहत असल्याने त्यांची ओळख झाली आणि ती हळूहळू प्रेमसंबंधात बदलली. नंतर शिंदे यांची बदली धाराशिवला झाली. त्यानंतर सुद्धा पिस्तूलच्या धाकावर पीडितेवर घरात घुसून अत्याचार केला. हा प्रकार जून आणि जुलै २०२५ मध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान पीडित महिला ही गर्भवती राहिल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान अत्याचारप्रकरणी जुलै महिन्याच्या अखेरीस शिंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून शिंदे हा फरार होता.
पतीने पहिले आणि…
मात्र, शुक्रवारी दुपारी पीडिता आणि शिंदे कारमधून फिरताना पीडितेच्या पतीने पाहिले आणि रंगेहाथ पकडलं. ते बीडच्या भाग्यनगर भागात फिरत होते. पीडितेच्या पतीने हे पाहताच पाठलाग सुरु केला. तुळजाई चौक, नगर नका आणि बसस्थानक मार्गे बाहेर निघण्यापूर्वी पतीने दुचाकी आडवी लावून शिंदे यांना कारमधून खाली खेचले आणि कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. पीडित त्या वेळेस तोंड बांधलेली कारमध्ये बसलेली होती.
पीडिता तीन दिवसांपासून गायब
पीडिता ही तीन दिवसांपासून घरातून गायब होती, ज्यामुळे तिच्या पतीला संशय आला. शुक्रवारी दुपारी हा संशय खरा ठरला. पतीने पीडिता आणि एपीआय रवींद्र शिंदे यांना कारमध्ये रंगेहाथ पकडले. दोघेही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेले. पीडितेने शिंदेविरोधात तक्रार देण्याऐवजी पतीवर आरोप केला, मात्र पोलिसांकडे सर्व माहिती असल्याने तिला शांत करून तक्रारीवर आधारित शिंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाणीनंतर शिंदे पुन्हा फरार
शिंदेंवर अत्याचाराचा गुन्हा दाखल असून तो फरार आहे. बीडमध्ये येऊन पिडीतेसोबत तो फिरत होता. शुक्रवारी दुपारी भर रस्त्यावर हाणामारी झाली आणि या हाणामारीचा वाद पोलिसांनी मिटवण्याचा प्रयत्न केला आणि पीडितेसह तिच्या पाटील पकडलं. मात्र आरोपी असलेल्या शिंदेला अभय दिल्यामुळे तो तेथून सुटून गेला आणि पुन्हा फरार झाला. पोलिसांनी नंतर स्पष्ट केले की, “शिंदे हा आरोपी आहे, हे त्यावेळी आम्हाला समजलेच नव्हते.” तर शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेवर तात्काळ कारवाई न करता निरीक्षण केले. या प्रकरणामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक